मोहित सोमण: काल उशीरा घोषित झालेल्या तिमाही निकालानंतर कोलगेट पामोलीव (Colgate Palmolive) शेअर ४% इंट्राडे उच्चांकावर कोसळला आहे. ब्रोकरेज कंपन्या सिटी व आयसीआयसीआय सिक्युरिटीज यांनी शेअरला 'सेल' कॉल दिल्याने आज गुंतवणूकदारांनीही शेअरला नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यंदाच्या तिमाहीतील निकालात कंपनीला निराशा प्राप्त झाली होती. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १७% घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत कंपनीला ३९५.०५ कोटींचा करोत्तर नफा प्राप्त झाला होता तो यंदा ३२७.५१ कोटी रूपये मिळाला आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नात (Total Income) मध्ये देखील इयर बेसिसवर घसरण झाली आहे. माहितीनुसार, कंपनीच्या उत्पन्नात ९.४७% घसरण होत १५३४.५३ कोटींवर पोहोचले. कंपनीच्या ईबीटा मार्जिनमध्येही घसरण झाली. इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीच्या ईबीटात ६.४% घसरण झाली असून गेल्या तिमाहीतील ४९७ कोटींच्या तुलनेत यंदा ४६५ कोटी रुपये मिळाला आहे.
निकालानंतर ब्रोकिंग कंपनी सीएलएसएने होल्ड कॉल दिला होता तर नोमुराने रिड्यूस (Reduce) कॉल दिला. एकूण ३३ विश्लेषकांपैकी १० ब्रोकिंग कंपन्यानी शेअरला बाय कॉल दिल्याने एकूण बाजारातील भावना शेअरबद्दल नकारात्मक झाल्या होत्या. अंतिमतः सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्या कलातच कंपनीचा शेअर ३.४% कोसळत २२०९.८ रुपयांवर सुरू झाला होता. सकाळी १०.२५ वाजता कंपनीचा शेअर ३.४५% घसरत २२१० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत होता. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीचा शेअर गे ल्या सहा महिन्यांत १७.८% कोसळला होता. तर गेल्या एका वर्षात कंपनीचा शेअर ३१.२७% घसरला होता.
कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी प्रति इक्विटी शेअर २४ रुपयांचा पहिला अंतरिम लाभांश (Interim Dividend) जाहीर केला आहे. कंपनीच्या भागभांडवलधारकांना एकूण लाभांश रक्कम ६५२.८ कोटी रुपये दिली जाणार आहे. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी आणि त्यानंतर दिली जाईल असे कंपनीने स्पष्ट केले. ३१ ऑक्टोबर ही रेकॉर्ड तारीख कंपनीकडून निश्चित करण्यात आली आहे.
निकालावर बोलताना फर्मच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ प्रभा नरसिंहन म्हणाल्या होत्या की,'या तिमाहीत, आमच्या संपूर्ण मौखिक आरोग्य पोर्टफोलिओवरील जीएसटी दर १८% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आले आहेत. आम्ही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करतो, कारण मौखिक आरोग्याला वाढती प्राधान्य म्हणून ओळखून ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी हे वेळेवर पाऊल आहे. प्रभावी तारखेपासून ग्राहकांना कमी किमती देण्यासाठी आम्ही आमच्या सर्व ग्राहकांसोबत जवळून काम केले. दुसऱ्या ति माहीतील उत्पन्न वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) पुनरावृत्तीमुळे किरकोळ विक्रेते आणि वितरकांमधील क्षणिक व्यत्यय दर्शवते.टॉपलाइन अडथळे असूनही, आम्ही आमच्या दीर्घकालीन धोरणात्मक उद्दिष्टांसाठी वचनबद्ध आहोत आणि ब्रँड गुंतवणुकीला प्राधान्य देत आहोत.'
त्या पुढे म्हणाल्या आहेत की,'कोलगेट व्हिजिबल व्हाइट पर्पल, आमच्या प्रगत व्हाइटनिंग टूथपेस्टच्या नेतृत्वाखाली प्रीमियम पोर्टफोलिओने मजबूत वाढीचा वेग कायम ठेवला. दुसऱ्या तिमाहीत, आम्ही पामोलिव्हची नवीनतम मोमेंट्स बॉडी वॉश श्रेणी सादर केली, जी तुमच्या दिवसभरातील विशिष्ट आंघोळीच्या क्षणांसाठी तयार केली गेली आहे'






