सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा मेळा पंढरपूरात भरणार आहे. त्यामुळे कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरात विठुरायाच्या भेटीला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने पुढाकार घेत विशेष गाड्या सोडण्याचे जाहिर केले आहे. या विशेष गाड्या शनिवार, २५ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू करण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेने याबद्दल प्रसिद्धीपत्रक जारी केले असून यामध्ये विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. पंढरपूर येथे भरणाऱ्या कार्तिकी वारीला येणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मिरज-लातूर आणि सोलापूर-मिरज दरम्यान विशेष गाड्यांची सेवा देण्यात येणार असल्याचे या प्रसिद्धीपत्रकाच्या निवेदनात म्हटले आहे. तसेच ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान एकूण ३६ विशेष रेल्वे फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
मिरज-लातूर विशेष गाड्या
-गाडी क्रमांक ०१४४३ मिरज-लातूर अनारक्षित विशेष गाडी ३० ऑक्टोबर २०२५ ते ०४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दररोज सकाळी ७:०० वाजता मिरजहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी ३:३० वाजता लातूरला पोहोचेल.
-गाडी क्रमांक ०१४४४ लातूर-मिरज अनारक्षित विशेष गाडी ३० ऑक्टोबर २०२५ ते ०४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दररोज सायंकाळी ४:०० वाजता लातूरहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री ११:४५ वाजता मिरजला पोहोचेल.
-गाडी क्रमांक ०१४४२ लातूर-मिरज अनारक्षित विशेष गाडी ३० ऑक्टोबर २०२५ ते ०४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दररोज सकाळी ६:०० वाजता लातूरहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी १:५० वाजता मिरजला पोहोचेल.
-गाडी क्रमांक ०१४४१ मिरज-लातूर अनारक्षित विशेष गाडी ३० ऑक्टोबर २०२५ ते ०४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दररोज १०:०० वाजता मिरजहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटो ५:३० वाजता लातूरला पोहोचेल.
मिरज ते लातूर दरम्यान वरील सर्व गाड्या पुढील स्थानकावर थांबतील: आरग, सलगरे, कवठेमहांकाळ, धालगाव, जाठ रोड, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, मोडलिंब, कुर्डुवाडी, शेंद्री, बार्सी टाऊन, पांगरी, धाराशिव, येडशी, कळंब रोड, ढोकी, मुरुड, औसा रोड आणि हरंगुळ
मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर आणि सोशल मीडिया ...
सोलापूर-मिरज विशेष गाड्या
-गाडी क्रमांक ०१४१९ सोलापूर-मिरज अनारक्षित विशेष गाडी ३० ऑक्टोबर २०२५ ते ०४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दररोज सकाळी ७:०० वाजता सोलापूरहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी १२:१० वाजता मिरजला पोहोचेल.
-गाडी क्रमांक ०१४२० मिरज-सोलापूर अनारक्षित विशेष गाडी ३० ऑक्टोबर २०२५ ते ०४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दररोज दुपारी १२:५० वाजता मिरजहून निघेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ७:०० वाजता सोलापूरला पोहोचेल.
सोलापूर ते मिरज दरम्यान वरील दोन गाड्या पुढील स्थानकावर थांबतील थांबे : मोहोळ, माढा, कुईवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जठ रोड, धालगाव, कवठेमहांकाळ, सलगरे आणि आरग.





