Friday, October 24, 2025
Happy Diwali

भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक अनुभवाची संधी! युनेस्कोचा इंटर्नशिप प्रोग्राम, आताच करा अर्ज

भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक अनुभवाची संधी! युनेस्कोचा इंटर्नशिप प्रोग्राम, आताच करा अर्ज

भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. युनेस्कोने पदव्युत्तर आणि पीएचडी विद्यार्थ्यांसाठी इंटरनॅशनल इंटर्नशिप प्रोग्राम जाहीर केला आहे. इंटर्नशिपसाठी अर्ज मागवणाऱ्या कंपनीने अर्ज करण्यापूर्वी काय तयारी असावी याची माहिती दिली आहे. ज्यामुळे अर्ज करणाऱ्या युवकांना निवडचाचणीची तयारी करणे सोपे जाणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे तरुणांना जागतिक कार्यक्षेत्रात व्यावसायिक अनुभव देणे आणि त्यांचे कौशल्य अधिक विकसित करणे, असा या इंटर्नशिपचा मुख्य उद्देश आहे. या इंटर्नशिपसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार careers.unesco.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराला पात्रतेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी: - इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्यांचे पदव्युत्तर किंवा पीएचडी शिक्षण असावे. अथवा पदव्यु्त्तरच्या समकक्ष उच्च शिक्षण कार्यक्रम असणे आवश्यक आहे.

- जर उमेदवाराने गेल्या १२ महिन्यांत पदव्युत्तर किंवा पीएचडी पूर्ण केली असेल, तरीही अर्ज करता येईल.

- पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांनी पदव्युत्तरसाठी प्रवेश घेतला असेल किंवा गेल्या १२ महिन्यांत पदवी पूर्ण केली असेल तर ते अर्ज करू शकतात.

- सचिवीय किंवा तांत्रिक पदांसाठी अर्ज करणाऱ्यांनी संबंधित विद्यापीठ किंवा तांत्रिक संस्थेत शेवटच्या वर्षात असणे आवश्यक आहे.

- उमेदवारांना इंग्रजी किंवा फ्रेंच भाषेचे उत्कृष्ट ज्ञान असणे आवश्यक आहे. मुख्यालयातील सचिवीय पदांसाठी दोन्ही भाषांवर प्रभुत्व आवश्यक असू शकते.

- तसेच MS Office, Google Workspace यासारख्या ऑफिस सॉफ्टवेअरमध्ये प्रवीणता हवी.

- आंतरराष्ट्रीय वातावरणात टीमवर्क करण्याची क्षमता, उत्तम संवादकौशल्य आणि किमान २० वर्षे वय ही अट लागू आहे.

- अर्ज करण्याआधी उमेदवारांनी प्रेरणा पत्र (Motivation Letter) आणि बायोडाटा (CV/Resume) तयार ठेवावा.

- अर्ज प्रक्रिया पूर्णपणे इंग्रजी किंवा फ्रेंच भाषेत असेल. जर कागदपत्रे इतर भाषेत असतील, तर त्यांचे साधे भाषांतर तयार ठेवणे गरजेचे आहे.

- तसेच तुमचा ईमेल आणि फोन नंबर किमान ६ महिने सक्रिय ठेवावा.

Comments
Add Comment