Friday, October 24, 2025
Happy Diwali

भारतानंतर आता अफगाणिस्तान पाकिस्तानचे पाणी अडवणार!

भारतानंतर आता अफगाणिस्तान पाकिस्तानचे पाणी अडवणार!

काबूल : भारतानंतर आता तालिबानशासित अफगाणिस्तान पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा मर्यादित करण्याची आणि नदीवर धरणे बांधण्याची तयारी करत आहे. तालिबानचे उपमाहिती मंत्री मुजाहिद फाराही यांनी सांगितले आहे की, जल आणि ऊर्जा मंत्रालयाला तालिबानचे सर्वोच्च नेता शेख हिबतुल्ला अखुंदझादा यांच्याकडून कुनार नदीवर धरण बांधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही नदी पाकिस्तानमध्येही वाहते आणि एकदा धरण बांधले गेले, की पाकिस्तानमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार हे निश्चित आहे.

अफगाणिस्तानच्या माहिती मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, तालिबानचा सर्वोच्च नेता मौलवी हिबतुल्लाह अखुंदजादा यांनी कुनार नदीवर शक्य तितक्या लवकर धरण बांधण्याचे आदेश दिले आहेत. उप माहिती मंत्री मुहाजेर फराही यांनी गुरुवारी एक्स वर ही माहिती शेअर केली. युसुफझाई यांच्या मते, सर्वोच्च नेते यांनी मंत्रालयाला परदेशी कंपन्यांची वाट पाहण्याऐवजी देशांतर्गत अफगाण कंपन्यांशी करार करण्याचे आदेश दिले.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या युद्धानंतर हे पाऊल उचलले जात आहे, पाकिस्तानसोबत पाणी वाटप करण्याच्या भारताच्या निर्णयानंतर अफगाणिस्तानचा हा निर्णय आला आहे. कुनार नदीवर धरण बांधण्याचा निर्णय पाकिस्तानसाठी दुहेरी धक्का ठरू शकतो, कारण भारताने याआधीच सिंधू नदी करार स्थगित केला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान आता ‘टू फ्रंट वॉटर वॉर’ म्हणजेच दोन दिशांनी पाण्याच्या संकटात अडकलेला देश ठरत आहे. एका बाजूला भारताचा ठाम निर्णय आणि आता दुसऱ्या बाजूला तालिबानकडून पाणी रोखण्याची तयारी त्यामुळे पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिकट होणार आहे.

४८० किलोमीटर लांबीची कुनार नदी पाकिस्तान सीमेजवळ अफगाणिस्तानातील हिंदू कुश पर्वतरांगांमधील ब्रोघिल खिंडीजवळ उगम पावते. ती कुनार आणि नांगरहार प्रांतांमधून दक्षिणेकडे वाहते. नंतर ती पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये प्रवेश करते, तिथे ती जलालाबाद शहराजवळ काबूल नदीला मिळते. कुनार नदीला पाकिस्तानमध्ये चित्रल नदी म्हणून ओळखले जाते. ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सर्वात मोठी आणि सर्वात मुबलक सीमापार नदी आहे. काबूल नदी अट्टोकजवळ सिंधू नदीला मिळते आणि पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात सिंचन आणि इतर पाण्याच्या गरजांसाठी महत्त्वाची आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >