Thursday, October 23, 2025
Happy Diwali

टाटा समुहातील वाद चिघळणार? मेहली मिस्त्री यांची टाटा समूहाला नवी अट

टाटा समुहातील वाद चिघळणार? मेहली मिस्त्री यांची टाटा समूहाला नवी अट

प्रतिनिधी:सोमवारी रात्री टाटा सन्सचे प्रभावी भागभांडवलदार व रतन टाटा यांचे निकटवर्तीय मेहली मिस्त्री यांनी टाटा सन्स संचालक मंडळासमोर पुर्ननियुक्ती संदर्भात नवीन अट टाकल्याने वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टाटा समुहात सगळे काही आलबेल नसताना रतन टाटा यांच्या निधनानंतर आणखीनच मेहली मिस्त्री व नोएल टाटा यांच्या समर्थकांत दुफळी माजली होती. कथित माहितीप्रमाणे, २१ ऑक्टोबरला मेहली मिस्त्री यांनी संचालक मंडळाला रात्री एका मेलद्वारे पुर्न नियुक्तांच्या शिफार शीबाबत नवी अट टाकली आहे. त्यातील माहितीनुसार, सरसकट सगळ्याच संचालक मंडळातील सदस्यांना पुन्हा नियुक्ती बिनविरोध करावी अशी अटकळ बांधली आहे. एकेकाळी निकटवर्तीय असलेल्या विजय सिंह यांच्यासह सगळ्याच सदस्यांची नेमणूक क रावी असा प्रस्ताव पारित करावा अशी गळ संचालक मंडळाकडे मेहली मिस्त्री यांनी घातली आहे.

प्रथमच टाटा यांचे निकटवर्तीय तसेच टाटा सन्स संचालक वेणु श्रीनिवासन यांची सर्वप्रथम पुर्ननियुक्ती करण्यात आली आहे. मात्र यासोबतच मिस्त्री यांनी स्वतः सह सगळ्याच संचालकांची पुन्हा नियुक्ती करावी अशी मागणी केली. मेहली मिस्त्री यांची संचालक पदा ची मुदत २८ ऑक्टोबरला संपत आहे. शापोरजी पालोनजी समूहाचे सर्वेसर्वा मेहली मिस्त्री यांचे टाटा सन्समध्ये १८% भागभांडवल (Stake) आहे. तर टाटा सन्समध्ये एकूण ५१% भागभांडवल दोराबजी टाटा ट्रस्ट व रतन टाटा ट्रस्ट यांच्याकडे आहे. त्यामुळे यांच्या तील वाद आता नवीन नाही.

मात्र भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने त्यांच्यातील संघर्ष चांगला नसल्याने स्वतः गृहमंत्री अमित शहा व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टाटा समुहातील उच्चपदस्थांची बैठक घेऊन मध्यस्थीचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सगळे काही वाद मिटतील अशी चिन्हे दिसू लागली होती. मात्र नवा प्रस्ताव शर्तीसह मंजूर केल्यासच मेहली मिस्त्री यांनी नव्या आगामी मुदतवाढीचा प्रस्तावाला मंजुरी देण्याचे स्पष्ट केले आहे. त्यांची नियुक्ती न झाल्यास इतर मंजूरीसाठी शापोरजी पालोनजी समूहाकडून विरोध करण्यात येणार आहे.

या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की मिस्त्री यांच्या संमतीसोबत एक अट होती, भविष्यातील सर्व विश्वस्त नूतनीकरण एकमताने मंजूर केले जावे आणि जर भविष्यात पुनर्नियुक्तीसाठी कोणताही ठराव एकमताने झाला नाही तर त्यांची मान्यता मागे घेतली जाईल. अशी पहिली नूतनीकरणाची अट मिस्त्री यांची स्वतःची असेल. मिस्त्रींनी घातलेली अट त्यांना नूतनीकरण न देण्याचा आणि त्याद्वारे त्यांना ट्रस्टमधून काढून टाकण्याचा कोणताही निर्णय घेण्यास प्रतिबंध करते.

उपलब्ध माहितीनुसार, नेमक्या शब्दात,'शंका टाळण्यासाठी, जर कोणत्याही विश्वस्ताने वेणू श्रीनिवासन यांची पुनर्नियुक्ती करण्याचा हा ठराव किंवा इतर सर्व विश्वस्तांसाठी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर समान एकमताने ठराव मंजूर न करण्याचा निर्णय घेतला, तर अशा परिस्थितीत, मी वेणू श्रीनिवासन यांच्या पुनर्नियुक्तीसाठी माझी औपचारिक मान्यता देत नाही. हे सांगण्याची गरज नाही की, अशी परिस्थिती उद्भवेल अशी मला अपेक्षा नाही' असे मेहलीच्या उत्तरात मेलमध्ये म्हटले गेले आहे.

आता नवीन प्रस्तावानुसार संचालक मंडळाच्या पुनर्नियुक्त्या आता आयुष्यभरासाठी वैध असणार आहेत दीर्घकाळ सेवा बजावणारे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनानंतर, विश्वस्तांनी असा निर्णय घेतला होता की, एकमताने निर्णय घेऊन त्यांचा सध्याचा कार्यकाळ नूतनीकरण केल्यानंतर, ते निश्चित कार्यकाळ न घेता आयुष्यभरासाठी विश्वस्त होतील.

आजीवन नियुक्ती झालेले पहिले विश्वस्त नोएल टाटा झाले होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले होते.सावत्र भाऊ रतन टाटा यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्त म्हणून त्यांचा कार्यकाळ या वर्षी जानेवारीमध्ये आयुष्यभरासाठी नूतनीकरण करण्यात आले आहे.

मेहली मिस्त्रींनी ११ सप्टेंबर रोजी टाटा ट्रस्टच्या वादग्रस्त बैठकीत विजय सिंग यांना टाटा सन्सच्या मंडळावरील नामांकित संचालकपदावरून काढून टाकण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला होता असे प्रसारमाध्यमांनी म्हटले होते. विशेषतः टाटा कुटुंब हे विजय सिंह यां च्या पुनः नियुक्तीसाठी प्रयत्नशील होते. त्यानंतरच गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रमुख विश्वस्त आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची भेट घेतली आणि त्यांना संदेश दिला की घर व्यवस्थित ठेवावे आणि विश्वस्तांमधील मत भेदांचा व्यवसाय समूहाच्या कामकाजावर परिणाम होऊ देऊ नये. या समूहाची राष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक धोरणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि कामकाज आहे.टाटा ट्रस्टने अद्याप यावर कोणतीही टिप्पणी केली नाही.

शनिवारी, टाटा ट्रस्ट्सने श्रीनिवासन यांचा सर दोराबजी टाटा ट्रस्ट (SDTT) च्या मंडळावरील विश्वस्त आणि उपाध्यक्ष म्हणून कार्यकाळ नूतनीकरण करण्याची मागणी करणारा ठराव पारित केला. त्यांचा कार्यकाळ सोमवारी संपला होता .

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >