
मोहित सोमण:आज सकाळी गिफ्ट निफ्टीतील मोठ्या वाढीनंतर आज शेअर बाजारात जबरदस्त तेजी पहायला मिळत आहे. सेन्सेक्स थेट ७८६.६० अंकांने व निफ्टी २१९.४० अंकांने उसळला आहे. सुरुवातीच्या कलात ही झालेली मोठी रॅली प्रामुख्याने बँक निर्दे शांकात झालेल्या मोठ्या वाढीनंतर झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये मुहुरत ट्रेडिंग दरम्यान घसरलेल्या बँक निफ्टीतील शॉर्ट कव्हर आज गुंतवणूकदारांनी भरून काढल्याचे जाणवत आहे. दुसरीकडे आज मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये झालेल्या वाढीमुळे आज बाजारात एकूणच तेजीचे वातावरण कायम आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ आयटी (२.३५%), एफएमसीजी (१.२९%), खाजगी बँक (०.९७%), मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (१.४४%) निर्देशांकात झाली असून घसरण कुठल्याही निर्देशांका त झालेली दिसत नाही दुसरीकडे मात्र व्यापक निर्देशांकात सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ निफ्टी १०० (०.७९%), मिड कॅप १५० (०.५२%), निफ्टी २०० (०.७६%) निर्देशांकात झाली आहे.मात्र अस्थिरता निर्देशांक ५.७९% उसळल्याने सकाळची रॅली अखेरच्या सत्रापर्यंत कायम राहील के पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान युएस भारत यांच्यातील प्रदीर्घ प्रलंबित व्यापार करार पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उर्जा, व शेतकी या क्षेत्रातील करारादरम्यान मतभेद कायम राहिल्याने हा करार पुढे सरकू शकला नव्हता. याचाच परिणाम म्हणून युएसने भारतावर ५०% अ तिरिक्त अधिभार लावला. मात्र रशियाकडून भारताने तेल खरेदी कपात केल्यास युएस भारतावरील कर (Tariff) हा १५% पर्यंत आणू शकतो असे तज्ञांकडून सांगितले जात आहे. जागतिक पातळीवरील युएस बाजारातील शेवटच्या सत्रात डाऊ जोन्स (०.०६%), एस अँड पी ५०० (०.५३%), नासडाक (०.९३%) निर्देशांकात घसरण झाली होती. तर आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. सर्वाधिक वाढ गिफ्ट निफ्टी (०.९२%) आहे तर सर्वाधिक घसरण निकेयी २२५ (१.४७%), कोसपी (०.६४%), शांघाई कंपोझिट (०.६६%) निर्देशांकात झाली आहे.
याशिवाय भारतीय निर्देशांकात दिवाळीत जीएसटी कपातीचा सकारात्मक फायदा म्हणून मोठ्या प्रमाणात वाढलेल्या व्यापारामुळे गुंतवणूकदारांना आश्वस्त केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील मजबूत तेजीचा फायदा शेअर बाजारासह कमोडिटी बाजारातही पहा यला मिळाला. वाढलेले सोने गेल्या दोन दिवसात जागतिक अस्थिरतेत काहीसा दिलासा मिळाल्याने स्वस्त झाले असले तरी आगामी भूराजकीय स्थितीत मध्यपूर्वेतील, विशेषतः अफगाणिस्तानमधील घडामोड, युक्रेन रशिया घडामोडीसह भारत युएस घडामोडीक डे बाजाराचे लक्ष लागले आहे. आज काही कंपन्याचे तिमाही निकाल जाहीर होणार असल्याने बाजारातील परिस्थितीवर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुरूवातीच्या कलात सर्वाधिक वाढ वर्धमान टेक्सटाईल (८.८४%), बिर्लासॉफ्ट लिमिटेड (७.२९%), वेलस्पून लिविंग (६.५९%), केपीआर मिल्स (४.२२%), भारत फोर्ज (३.९४%), ट्रायडंट (३.८७%), न्यूजेन सॉफ्टवेअर (३.७४%), सोनाटा सॉफ्टवेअर (३.६३%), आलोक इंडस्ट्रीज (३.५२%), इन्फोसिस (३.०३%), परसिटंट सिस्टिम (३.०२%), एचसीएल टेक्नॉलॉजी (२.५९%), वरूण बेवरेज (२.३४%), एसबीआय कार्ड (२.३३%), युनायटेड बेवरेज (२.२९%), बजाज होल्डिंग्स (२.२५%) समभागात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण एथर एनर्जी (६.२७%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (३.८९%), सीपीसीएल (३.६२%), एमआरपीएल (३.५६%), मुथुट फायनान्स (३.४३%), एनएमडीसी (२.२४%), हिंदुस्थान कॉपर (२.०२%), डिक्सन टेक्नॉलॉजी (१.७५%), अपोलो टायर्स (१.७४%), होम फर्स्ट फायनान्स (१.६४%), एसबीएफसी फायनान्स (१.६३%), सी ई इन्फो सिस्टिम (१.४२%), अंबर एंटरप्राईजेस (१.३९%), अनंत राज (१.३७%), पुनावाला फायनान्स (१.३५%), आय आय एफ एल फायनान्स (१.३४%), होंडाई मोटर्स (१.२८%), ग्लोबल हेल्थ (१.१५%) समभागात झाली आहे.