Thursday, October 23, 2025
Happy Diwali

रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, अक्षर पटेलसह तळाचे फलंदाज चमकले; भारताने ऑस्ट्रेलियापुढे ठेवले एवढे मोठे आव्हान

रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, अक्षर पटेलसह तळाचे फलंदाज चमकले; भारताने ऑस्ट्रेलियापुढे ठेवले एवढे मोठे आव्हान

अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पर्थमध्ये झालेला पहिला सामना ऑस्ट्रेलियाने सात गडी राखून डकवर्थ लुईस नियमानुसार जिंकला. आता अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ५० षटकांत नऊ बाद २६४ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियापुढे ५० षटकांत २६५ धावा करण्याचे आव्हान ठेवले. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने ५९ वे तर श्रेयस अय्यरने २३ वे अर्धशतक केले. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर व्यतिरिक्त अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप, वॉशिंग्टन सुंदर यांनी झटपट धावा करुन सांघिक कामगिरीत महत्त्वाचे योगदान दिले.

कर्णधार शुभमन गिल नऊ धावा करुन आणि विराट कोहली शून्य धावा करुन परतल्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागिदारी रचली. रोहित आणि श्रेयस यांच्यामुळे भारताचा डाव सावरला. पण एका टप्प्यावर रोहित आणि श्रेयस बाद झाले. यानंतर अक्षरने सूत्रं हाती घेतली. नंतर तळाच्या फलंदाजांपैकी हर्षित राणा, अर्शदीप, वॉशिंग्टन सुंदर यांनी झटपट धावा वाढवल्या. यामुळे भारताने २५० धावांचा टप्पा ओलांडला.

भारताकडून रोहित शर्माने ९७ चेंडूत ७३ धावा, श्रेयस अय्यरने ७७ चेंडूत ६१ धावा आणि अक्षर पटेलने ४१ चेंडूत ४४ धावा केल्या. केएल राहुलने ११, वॉशिंग्टन सुंदरने १२, नितीश रेड्डीने ८, हर्षित राणाने नाबाद २४, अर्शदीपने १३, मोहम्मद सिराजने नाबाद शून्य धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून झम्पाने चार तर बार्टलेटने तीन आणि स्टार्कने दोन विकेट घेतल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >