Thursday, October 23, 2025
Happy Diwali

रितेश देशमुखने शब्द पाळला; पाठपुरावा करुन मृत ज्युनियर आर्टिस्टच्या कुटुंबाला केली लाखमोलाची मदत!

रितेश देशमुखने शब्द पाळला; पाठपुरावा करुन मृत ज्युनियर आर्टिस्टच्या कुटुंबाला केली लाखमोलाची मदत!

मुंबई : 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान साताऱ्याजवळ कृष्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या सौरभ शर्मा या ज्युनियर आर्टिस्टच्या कुटुंबाला रितेश देशमुखने दिलेले वचन आज पूर्ण केले. चित्रपटाच्या शूटिंगमध्ये झालेल्या या भीषण अपघातानंतर रितेशने सौरभच्या कुटुंबाला मदत करण्याचे आश्वासन दिले होते, आणि त्याचा न विसरता पाठपुरावा करून त्याने १५ लाख रुपयांची मोठी रक्कम थेट सौरभच्या आईच्या खात्यावर जमा केली आहे.

नेमकी घटना काय घडली होती?

दोन महिन्यांपूर्वी 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या एका गाण्याचे शूटिंग साताऱ्यातील संगम माहुली येथे सुरू होते. हळदीच्या सीनमुळे अंगाला हळद लागल्याने सौरभ शर्मा (डान्सर) आपल्या सहकाऱ्यांसोबत जवळच्या कृष्णा नदीवर आंघोळीसाठी गेला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच अभिनेता तथा दिग्दर्शक रितेश देशमुख, त्याची पत्नी जेनेलिया देशमुख आणि नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रितेशने स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून शोधकार्य वेगाने करण्याची विनंती केली होती, त्यानंतर दोन दिवसांनी सौरभचा मृतदेह हाती लागला होता. मूळचा जोधपूरचा असलेला सौरभ मुंबईत डान्सर म्हणून काम करत होता.

सौरभच्या मृत्यूनंतर रितेश देशमुख यांनी त्याच्या शोकाकुल कुटुंबाला आर्थिक मदतीचा शब्द दिला होता. त्यांनी केवळ शब्द दिला नाही, तर इन्शुरन्स कंपनीकडे पाठपुरावा करून १५ लाख रुपयांचा क्लेम मंजूर करून घेतला आणि ती रक्कम त्वरित कुटुंबाला ट्रान्सफर केली.

या मानवी सहानुभूतीच्या आणि जबाबदारीच्या कृतीबद्दल 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज'चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी रितेश देशमुख यांचे आभार मानले. सिने-जगातील या दुःखद घटनेत रितेश देशमुखने दाखवलेली तत्परता आणि वचनपूर्ती, हे एका कुटुंबासाठी मोठा आर्थिक आणि मानसिक आधार ठरले आहे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >