
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे राजकीय वारसदार कोण, यावरून सातत्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. या चर्चेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका करणाऱ्या करुणा मुंडे शर्मा (Karuna Munde Sharma) यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. करुणा शर्मा यांनी अलीकडेच धनंजय मुंडे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. त्या म्हणाल्या की, "राजकारणात पोटचा नव्हे, तर विचारांचा वारसा असतो. हे धनंजय मुंडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारस धनंजय मुंडे हेच आहेत." करुणा शर्मा यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता यावर मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनीही आपली भूमिका मांडली आहे. प्रकाश महाजन यांनी नुकतीच त्यांच्या अधिकृत फेसबुकवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी करुणा मुंडे यांच्या विधानावर निशाणा साधला आणि स्पष्ट केले की, गोपीनाथ मुंडे यांच्या खऱ्या वारसदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) आहेत. यामुळे, गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसावरून सुरू असलेला हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई : दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या आगामी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' (Punha Shivajiraje Bhosale) या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच मोठी ...
प्रकाश महाजन काय म्हणाले?
करुणा मुंडे शर्मा यांनी धनंजय मुंडे यांना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारसदार ठरवल्यानंतर, मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी फेसबुक पोस्टद्वारे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना प्रकाश महाजन यांनी अत्यंत कठोर शब्दांत आपली मते मांडली. ते म्हणाले, "काय जमाना आला आहे! स्वर्गीय मुंडे साहेबांचा (Gopinath Munde) वारस कोण ठरवत आहे?" त्यांनी या चर्चेत सहभागी असलेल्या व्यक्तींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला: "एक भ्रष्टाचारी, कारागृहात बरेच महिने काढून आलेला आणि दुसरी जी रोज उठून आपल्याच कुंकवाची अब्रू जगाच्या वेशीवर टांगते." या विधानांनंतर प्रकाश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी ठामपणे सांगितले की, "स्वर्गीय मुंडे साहेब यांचा वारसा, मग तो सामाजिक असो किंवा राजकीय, तो फक्त आणि फक्त माझी 'पंकू ताई', दुसरे कोणी नाही," असे म्हणत त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाच गोपीनाथ मुंडे यांच्या खऱ्या वारसदार म्हणून घोषित केले. महाजन यांच्या या थेट आणि टोकदार वक्तव्यामुळे मुंडे यांच्या वारसावरून सुरू असलेला राजकीय वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
'गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार धनंजय मुंडेच!'
बीडमध्ये नुकत्याच झालेल्या ओबीसींच्या महाएल्गार सभेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपल्या भाषणात एक महत्त्वाचे विधान केले. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे राजकीय वारसदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हेच आहेत. ओबीसींच्या न्याय आणि हक्कांसाठी त्यांनी काम करत राहावे, असे आवाहनही भुजबळ यांनी केले. भुजबळांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली. याच चर्चेत करूणा मुंडे शर्मा (Karuna Munde Sharma) यांनी भाष्य करत चक्क धनंजय मुंडे यांचे कौतुक केले. करुणा मुंडे म्हणाल्या की, आपण धनंजय मुंडे यांच्या राजकीय संघर्षाचे साक्षीदार आहोत. "२००९ ते २०१९ या काळात धनंजय मुंडे यांनी जो संघर्ष केला, त्यात मी ही त्यांच्यासोबत होते," असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या संघर्षाला दुजोरा दिला. छगन भुजबळ आणि करूणा मुंडे यांच्या विधानांमुळे गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदारांच्या विषयावरून आता पुन्हा एकदा नवा राजकीय वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
गोपीनाथ मुंडेंच्या वारसावर करूणा मुंडेंची ठाम भूमिका
ओबीसी महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार म्हटले होते. त्यांच्या या विधानाला करुणा मुंडे शर्मा यांनी १०० टक्के सत्य असल्याचे सांगत दुजोरा दिला आहे. करुणा मुंडे यांनी स्पष्ट केले की, "राजकारणामध्ये पोटचा (रक्ताचा) वारसा नसतो, तो विचारांचा वारसा असतो आणि आज हे धनंजय मुंडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे." घरात वाद झाले असले तरी, धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणेच तळागाळामध्ये जाऊन लोकांमध्ये काम केले आणि स्वतःचे व्यक्तित्व निर्माण केले. या माध्यमातून त्यांनी मुंडे साहेबांच्या कामाचा आणि विचारांचा वारसा पुढे नेला आहे, असे मत करुणा मुंडे यांनी व्यक्त केले. याच आधारावर करुणा मुंडे यांनी ठामपणे सांगितले की, "गोपीनाथराव मुंडे साहेबांचा खरा राजकीय वारस हे धनंजय मुंडेच आहेत आणि त्यांची सून म्हणून मी सुद्धा!" धनंजय मुंडे यांनी आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडले आहे, असे कौतुकही करूणा मुंडे यांनी केले.
'पंकजांना हरवण्यात भाजपचा हात', त्या कठीण काळात भावाने कर्तव्य निभावले...
गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदारांच्या वादात करुणा मुंडे शर्मा (Karuna Munde Sharma) यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. करुणा मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) पराभवावर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, पंकजा मुंडेंना हरवण्यामध्ये भाजपाचा (BJP) हात होता. या पराभवामुळे पंकजा मुंडे यांचे खच्चीकरण झाले आणि त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. या कठीण काळात भाऊ म्हणून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपले कर्तव्य पार पाडले. यानंतरच दोघा बहीण-भावांनी (पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे) एकत्र मंत्रिपदाची शपथ घेतली, असेही करुणा मुंडेंनी सांगितले. याचवेळी, धनंजय मुंडेंच्या राजकीय वारसावर स्तुतीसुमने उधळणाऱ्या करुणा मुंडेंनी त्यांच्याशी आपला नेमका वाद कशावरून आहे, हेही स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, "धनंजय मुंडे यांचा आणि माझा काही वाद नाही, त्यांच्या वृत्तीचा आणि माझा वाद आहे." करुणा मुंडे यांच्या या खुलाशानंतर आणि लगेचच मनसेचे माजी नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केलेल्या विधानामुळे आता बीडमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.