
मोहित सोमण: एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) या भारतीय कमोडिटी बाजारातील नियमावलीत बदल करण्यात आले आहेत. नव्या तरतुदीनुसार एमसीएक्सने परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे की, 'दिनांक १७ ऑक्टोबर पासून संरचित जोखीम आणि जोखीम व्यवस्थापनाचा भाग म्हणून चांदीतील मंथली फ्युचर कॉन्ट्रॅक्टवर (महिना करार) अतिरिक्त २.५०% कर लागणार आहे तर सोन्यावर नजीकच्या मंथली फ्युचर कॉन्ट्रॅक्टवर १.००% अतिरिक्त अधिभार (कर) लागणार आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे.परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, २३ बँक ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून हे नवे दर लागू होणार आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंचने (NSE) दिलेल्या नव्या परिपत्रकानुसार, या सोन्याच्या चांदीच्या मार्जिनमध्ये करण्यात आलेली ही वाढ ही अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर वाढत्या चढउतारामुळे करण्यात आलेली आहे. त्यामुळे जोखीम व्यवस्थापनाचा भाग म्हणून मार्जिनमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या नियमानुसार, कमोडिटी बाजारातील गुंतवणूकदारांना आपल्या सोन्या चांदीच्या पोझिशन होल्ड करणे महागडे ठरणार आहे. नव्या पोझिशन निर्मितीसाठी हा नवा नियम लागू असेल. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या खिशाला अधिकचा चाट पडणार आहे.
मार्जिन म्हणजे काय?
ही एक ठेव किंवा तारण असते जी फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टवरील संभाव्य तोटा भरून काढण्यासाठी व्यापाऱ्याने सुनिश्चित केलेली असते. ही ठेव वाढवून, एनएसई प्रभावीपणे व्यापाऱ्याचा लेव्हरेज कमी करतो.अतिरिक्त मार्जिन म्हणजे सामान्य मार्जिन आवश्यकतेपेक्षा जा स्त वाढ आहे. त्यामुळे केलेल्या तरतुदीत आणखी भर पडल्याने नुकसान नियंत्रित केले जाते. एनएसईने मार्जिन आवश्यकता वाढवण्याचा निर्णयाची पार्श्वभूमी म्हणजे या वर्षात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. स्वाभाविकच, यामुळे सोन्या च्या किमतीत अधिक अस्थिरता निर्माण झाली आहे आणि सट्टेबाजी (Spot Betting) वाढली आहे. सोने आणि चांदी, जोखीम मालमत्तेपेक्षा तुलनेत सुरक्षित गुंतवणूक मालमत्ता असल्याने मार्जिन वाढवण्याच्या निर्णयामुळे जास्त खर्च येऊ शकतो ज्यामुळे या अनि यंत्रित किंमतींच्या चढउतारांना कारणीभूत ठरणाऱ्या सट्टेबाज खरेदी-विक्रीला आळा बसू शकतो असे बाजाराचे म्हणणे आहे. करार खरेदी किंवा विक्री करत असले तरी वाढलेल्या सामान्य मार्जिन आवश्यकतांमुळे त्यांचे नुकसान भरून काढू शकतात. शेवटी, या हालचालीमुळे सोने आणि चांदीच्या भविष्यातील व्यापारात अधिक स्थिरता येऊ शकते.