Thursday, October 23, 2025
Happy Diwali

IND vs AUS: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, भारताला फलंदाजीस बोलावले

IND vs AUS: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, भारताला फलंदाजीस बोलावले

अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना आहे. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पहिल्यांदा फलंदाजीस बोलावले आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेट संघ, विशेषतः ऍडलेड येथे होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी संघात मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे. युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात असलेला भारतीय संघ, आगामी सामन्यात विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे, ज्यामुळे अंतिम ११ मध्ये 'धुरंधर' खेळाडूच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

या सामन्यासाठी भारतीय संघात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग ११मध्ये तीन बदल झाले आहेत. जोश फिलिप, नाथन एलस आणि मॅथ्यू कुहृमैन हे सामन्यातनाहीत. त्यांच्या जागी अनुक्रमे एलेक्स कॅरी, जेवियर बार्टलेट आणि एडम झाम्पा यांना अंतिम ११मध्ये स्थान देण्यात आले आहे.

दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाचे प्लेईंग ११ - ट्रेविस हेड, मिचेल मार्श(कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू रेनश, एलेक्स कॅरी(विकेटकीपर), मिचेल ओवेन, कूपर कोनोली, मिचेल स्टार्क, जेवियर बार्टलेट, जोश हेझलवूड आणि एडम झाम्पा.

भारताचे प्लेईंग ११ - रोहित शर्मा, शुभमन गिल(कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल(विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद सिराज.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा