"मला कधी लग्न करायचं नव्हतं पण..." पॉलाच्या एका मेसेजनं बदललं सारंगचं आयुष्य

पुणे : भारतीय डिजिटल पार्टी (भाडिपा) या लोकप्रिय मराठी यू ट्यूब चॅनलचा संस्थापक आणि अभिनेता सारंग साठे याने त्याची प्रेयसी पॉला हिच्याशी २८ सप्टेंबर रोजी लग्नगाठ बांधली. अनेक वर्षांपासून एकत्र असलेल्या या जोडप्याने आतापर्यंत एक कागद आमचं नातं ठरवू शकत नाही अशी भूमिका घेत लग्न न करता प्रेमाने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अखेर त्यांनी साधेपणाने विवाह केला आणि यामागचं कारण त्यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे.


भाडिपाच्या यू ट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पॉला आणि सारंग यांनी त्यांच्या या निर्णयामागील भावनिक प्रसंग उघड केला. पॉलाने सांगितले की, साधारण वर्षभरापूर्वी पॅरिसहून मुंबईला येताना तिचं विमान इराकजवळ आलं होतं. यानंतर विमान वळविण्याचा निर्णय झाला. पायलटने जाहीर केलं की इराणने इस्त्रायलवर हल्ला केला असून पुढे जाणं शक्य नाही. या घटनेमुळे ती घाबरली आणि सारंगला काहीही झालं तरी मी तुझ्यावर प्रेम करते असा मेसेज पाठवला.



त्या क्षणी पॉलाला जाणवलं की, आयुष्यात काहीही घडू शकतं आणि आपल्याला आवडत्या व्यक्तीसोबत आयुष्याचं पुढचं पाऊल टाकायला हवं. त्यामुळेच तिने सारंगसमोर लग्नाची इच्छा व्यक्त केली. पॉलाची भावनिक अवस्था पाहून सारंगनेही तत्काळ लग्नाचा निर्णय घेतला.


दोघांनीही अत्यंत साधेपणाने विवाह केला. नंतर भाडिपा टीमने ऑफिसमध्येच मराठमोळ्या पद्धतीने छोटेखानी समारंभ आयोजित करून त्यांना सरप्राइज दिलं. या विवाहाबद्दल चाहत्यांकडून आणि सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment

Amaal Mallik : अमाल मलिकचा चित्रपट संगीताला तात्पुरता विराम; म्हणाला, ‘आता माझ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार’

मुंबई : संगीतकार आणि गायक अमाल मलिकने सध्यापुरता चित्रपटांसाठी नवीन संगीत देण्यापासून दूर राहण्याचा निर्णय

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर

Shweta Tiwari : श्वेता तिवारी प्रकरणात मोठा ट्विस्ट; ट्रोलर मनसेचा सदस्य नसल्याचं उघड

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीने ऑनलाइन महिलांविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या काही सोशल

Kriti Sanon Rakhi Ad : कृती सेनॉनच्या राखी जाहिरातीचा वाद चिघळला; सोनू निगमच्या नावाने फेक पोस्ट अन् मोठा ट्विस्ट!

मुंबई : कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. GIVAच्या या

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत

Sonu Nigam : कृती सेनॉनच्या राखी जाहिरातीवरून गायक सोनू निगमची सणसणीत ट्विटर पोस्ट, म्हणाला...

मुंबई : अभिनेत्री कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू असलेल्या वादात आता गायक सोनू निगमने (Sonu Nigam) भूमिका