गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द


पुणे : गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयाने हा आदेश जारी केला आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळ बाबत अहवाल सादर केला होता. यानंतर पासपोर्ट प्रदेश कार्यालयाने घायवळचा पासपोर्ट रद्द केल्याचा आदेश काढला आहे. पासपोर्ट रद्द झाल्यामुळे गुंड निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत.


घायवळने खोटी माहिती देऊन, बनावट कागदपत्रे सादर करुन पासपोर्ट काढला होता. याच पासपोर्टच्या मदतीने तो परदेशात फरार झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. या पार्श्वभूमीवर घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.


गुंड निलेश घायवळने Ghaywal या नावातील h काढून Gaywal असे केले. यानंतर त्याने गायवळ या नावाने अहिल्यानगरमधील खोटा पत्ता दाखवत 23 डिसेंबर 2019 रोजी तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला होता. पासपोर्ट मिळाल्यानंतर त्याचा वापर करुन तो फरार झाला, असे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पुरावे सादर केल्यानंतर पासपोर्ट प्रदेश कार्यालयाने घायवळचा पासपोर्ट रद्द केला. जो पासपोर्ट १६ जानेवारी २०२० रोजी गायवळ या नावाने देण्यात आला तो पासपोर्ट तातडीने पुणे पोलिसांकडे अथवा पासपोर्ट प्रदेश कार्यालयाकडे जमा करावा, असेही पासपोर्ट प्रदेश कार्यालयाच्या आदेशात नमूद आहे.


घायवळवर पुण्यात सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करणे, कायद्याचे उल्लंघन करणे, दरोडा टाकणे असे विविध गंभीर गुन्हे नोंदवले आहेत. पुणे पोलीस सध्या फरार असलेल्या गुंड निलेश घायवळला शोधत आहेत.


Comments
Add Comment

सकाळच्या सत्रात शेअर बाजार कोसळले 'या' कारणामुळे बाजाराचा घात? सेन्सेक्स १२७.८४ व निफ्टी ४२.७५ अंकांने घसरला

मोहित सोमण: आज सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स १२७.८४ व निफ्टी ४२.७५

रायगडच्या राजकारणाला संघर्षाची किनार

खोपोलीतील हत्याकांडाने जिल्ह्यातील जुन्या घटनांचे स्मरण सुभाष म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्याचे राजकारण

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

पश्चिम रेल्वेवर आजपासून विविध मार्गांवर रेल्वे ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेने कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाच्या बांधकामासाठी १८ जानेवारी २०२६

आरे ते कफ परेड मेट्रो रात्रभर धावणार

बुधवारी मेट्रोच्या विशेष फेऱ्यांचे नियोजन मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी

नववर्षाच्या रात्री ‘लेट नाईट’ बेस्ट बससेवा

गेटवे ते गोराईपर्यंत बेस्टची स्पेशल राइड मुंबई : नववर्ष स्वागतासाठी बुधवारी (दि. ३१) रोजी रात्री मोठ्या