दिल्ली : गायक ऋषभ टंडन दिवाळी साजरी करण्यासाठी त्याच्या दिल्लीच्या घरी गेला होता. तिथेच त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू नंतर पत्नी ओलेसिया नेदोबेगोवा हिने सोशल मीडियावर ऋषभ टंडन सोबत घालवलेल्या खास क्षणांचे फोटो पोस्ट केले. भावपूर्ण श्रद्धांजली देते ती भावनिक झाली.

ओलेसियाने पोस्ट केले की, मी तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेन, तू माझ्यासोबत कायम आहेस , माझा आत्मा , माझं प्रेम , मित्र , माझं हृदय.... तू सर्वत्र असशील.
ऋषभ टंडन सोशल मीडियावर कारवाचौथच्या दिवशी अॅक्टिव्ह होता. त्याने पत्नी सोबत कारवाचौथचे फोटो शेअर केले होते. अनेक चाहत्यांनी त्या फोटोंना लाईक केले होते.