
नवी दिल्ली : निवडणूक आयोग नोव्हेंबरपासून देशभरात SIR (Special Intensive Revision) मोहीम राबविणार आहे. बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यामुळे बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी SIR (Special Intensive Revision) मोहीम राबविण्यात आली. आता देशातील उर्वरित राज्यांमध्ये SIR (Special Intensive Revision) मोहीम राबविण्यात येणार आहे.
बिहारमध्ये SIR (Special Intensive Revision) मोहीम सुरू असताना काँग्रेसने विरोध केला. सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. पण सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून देशभर SIR (Special Intensive Revision) मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबवली जाणार असून, २०२६ मध्ये निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये ती प्रथम राबविली जाईल. या पहिल्या टप्प्यात आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश असेल.
दिल्लीत निवडणूक आयोगाची बैठक सुरू आहे. या दोन दिवसांच्या बैठकीसाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील मुख्य निवडणूक अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत SIR (Special Intensive Revision) मोहिमेसाठी नियोजन होणार आहे.
योग्य कागदपत्रे दाखवली तरच निवडणूक आयोग मतदाराच्या वैधतेवर शिक्कामोर्तब करणार आहे. प्रत्येक मतदाराला फक्त एकाच भागातून मतदान करता येणार आहे. एखादा पश्चिम बंगालचा कामगार महाराष्ट्रात काम करत असेल तर योग्य कागदपत्रे सादर करुन त्याला मतदानासाठी महाराष्ट्रात किंवा पश्चिम बंगालमध्ये असे एका ठिकाणच्या मतदार यादीतच नाव ठेवता येणार आहे.