Thursday, October 23, 2025
Happy Diwali

मुख्यमंत्री शनिवारी जाणार नाशिक दौऱ्यावर

मुख्यमंत्री शनिवारी जाणार नाशिक दौऱ्यावर
नाशिक : अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे ३८ वे अधिवेशन शनिवार, दि. २५ ते रविवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. जय शंकर, फेस्टिव्हल लॉन्स, छत्रपती संभाजीनगर रोड, जेजुरकर मळा, पंचवटी येथे होणाऱ्या या सोहळ्याला अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कविश्वर कुलाचार्य विद्वांसबाबा शास्त्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री, खासदार, आमदार संत, महंत, सद्भक्त, पुजारी उपस्थित राहणार आहेत. पूर्वनियोजित दौऱ्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस नाशिक शहरात या अधिवेशनासाठी रविवारी (दि. २६) उपस्थित राहणार होते; परंतु आता शनिवारी, दि. २५ ऑक्टोबर रोजी उपस्थित राहणार आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >