Thursday, October 23, 2025
Happy Diwali

'क्योंकि सास भी कभी बहू थी' २ मध्ये झळकणार बिल गेट्स

'क्योंकि सास भी कभी बहू थी' २ मध्ये झळकणार बिल गेट्स
मुंबई : २००० ते २००८ च्या कालावधीत घराघरात पोहोचलेली हिंदी मालिका म्हणजेच 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका आता सीजन २ सह परत आली आहे. यावेळी ही मालिका यातील कथा ही नात्यांपुरता किंवा त्या मालिकेच्या पात्रांपुरती मर्यादित न राहता सामाजिक आणि तांत्रिक मुद्द्यांना देखील हात लावणार आहे. पहिल्यांदाच बिल गेट्स भारतीय टीव्ही शो मध्ये दिसणार आहेत. बिल गेट्स लवकरच आपल्याला एकता कपूरच्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी' २ या हिंदी मालिकेत पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांइतकेच मालिकेतील कलाकारही बिल गेट्स सोबत काम करण्यास, त्यांना भेटण्यास उत्सुक आहेत. स्टार प्लस वरील नवीन प्रोमो मध्ये स्मृती इराणी यांची व्यक्तिरेखा तुलसी विराणी व्हिडीओ कॉल वरून कोणाशी तरी बोलताना दिसत आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे बिल गेट्स. एका वृत्तानुसार बिल गेट्स हे हिंदी मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी' २ या हिंदी मालिकेत पाहुणे म्हणून येणार आहेत. स्मृती इराणी याबद्दल एक मुलाखतीत म्हणाल्या की भारतीय मनोरंजनासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. महिला आणि मुलांचे आरोग्य बऱ्याच काळापासून मुख्य प्रवाहाच्या चर्चेतून बाहेर राहिले आहे. हे एक पाऊल ते बदलण्यासाठीचा एक मोठा प्रयत्न, जगातील सर्वात आदरणीय व्यक्तिमत्वांपैकी एक व्यक्तिमत्व भारतीय टीव्ही मालिकेत दिसणे ही केवळ एक सहकार्याची बाब नाही तर ती जागरूकता आणि बदलाची सुरुवात आहे. बिल गेट्स हे २४ व २५ऑक्टोबर रोजी प्रसारित होणाऱ्या एपिसोडस मध्ये दिसणार आहेत. हे दोन्ही एपिसोड पूर्णपणे आरोग्याच्या जागरुकतेवर लक्ष केंद्रित करतील विशेषतः गर्भवती महिला आणि नवजात शिशूंच्या आरोग्याच्या बाबतीत, बिल गेट्स यांचा हा कॅमिओ बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्या भागीदारीतून तयार करण्यात आला आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >