Thursday, October 23, 2025
Happy Diwali

अ‍ॅडलेड ODI : ऑस्ट्रेलियाची आक्रमक गोलंदाजी, भारताचा निम्मा संघ तंबूत

अ‍ॅडलेड ODI : ऑस्ट्रेलियाची आक्रमक गोलंदाजी, भारताचा निम्मा संघ तंबूत

अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पर्थमध्ये झालेला पहिला सामना ऑस्ट्रेलियाने सात गडी राखून डकवर्थ लुईस नियमानुसार जिंकला. आता अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारताची स्थिती चिंताजनक अशीच आहे.

पर्थ पाठोपाठ अ‍ॅडलेडमध्येही नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. अ‍ॅडलेडमध्ये भारताने ४१.३ षटकांत पाच बाद २१२ धावा केल्या. सलामीवीर रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५९ वे अर्धशतक झळकावले. तो ९७ चेंडूत दोन षटकार आणि सात चौकार मारत ७३ धावा करुन स्टार्कच्या चेंडूवर हेझलवडकडे झेल देऊन बाद झाला. रोहितला उत्तम साथ देणारा श्रेयस अय्यर ६१ धावा करुन त्रिफळाचीत झाला. याआधी कर्णधार शुभमन गिल नऊ धावा करुन तर विराट कोहली शून्य धावा करुन तंबूत परतल्यामुळे भारतावरील दबाव वाढला. केएल राहुल ११ धावा करुन बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून झेवियर बार्टलेट आणि अ‍ॅडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन तर मिचेल स्टार्कने एक बळी घेतला.

अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर खेळत आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >