Friday, November 14, 2025

२०२६ हिवाळी ऑलिंपिकसाठी अभिनव बिंद्रा मशालवाहक

२०२६ हिवाळी ऑलिंपिकसाठी अभिनव बिंद्रा मशालवाहक

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या २०२६ हिवाळी ऑलिंपिकसाठी ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राची मशालवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. ही क्रीडा स्पर्धा ६ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान इटलीतील मिलान आणि कोर्टिना डी'अँपेझो येथे होणार आहे.

सोशल मीडियावर आनंद व्यक्त करताना अभिनव बिंद्राने लिहिले की, "मिलानो-कॉर्टिना २०२६ ऑलिंपिक मशाल रिलेसाठी मशालवाहक म्हणून निवड होणे खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. ऑलिंपिक मशाल नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ राहिली आहे - ती स्वप्ने, चिकाटी आणि खेळाद्वारे जागतिक एकतेचे प्रतीक आहे. ती पुन्हा घेऊन जाणे हा सन्मान आणि प्रेरणा दोन्ही आहे. या अद्भुत सन्मानाबद्दल मिलानो-कॉर्टिना २०२६ चे आभार."

२००८ च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये १० मीटर एअर रायफल स्पर्धेत बिंद्राने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. हे इटलीचे चौथे हिवाळी ऑलिंपिक असणार आहे. या हंगामात १६ खेळांमध्ये ११६ पदक स्पर्धा होणार आहेत. आणि हे बीजिंग २०२२ पेक्षा सात जास्त असणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा