Tuesday, November 11, 2025

मराठी संस्कृती जपणारे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजन करणार - शेलार

मराठी संस्कृती जपणारे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजन करणार - शेलार
मुंबई : ग. दि. माडगूळकर, जगदिश खेबुडकर आणि मंगेश पाडगांवकर या शब्द प्रभूच्या कार्यातून प्रेरणा घेऊन मराठी संस्कृती जपणारेमं कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येतील, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने रसिकांची दिवाळी स्वर संगीताने उजळण्यासाठी मंगळवारी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, दादर, मुंबई येथे स्व. ग. दि. माडगूळकर, स्व. जगदिश खेबुडकर आणि स्व. मंगेश पाडगांवकर यांच्या गाजलेल्या चित्रपट गीतांचा व भावगीतांचा बहारदार कार्यक्रम दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न झाला. या दिवाळी पहाट कार्यक्रमास सिद्धीविनायक मंदिराचे विश्वस्त जितेंद्र राऊत, स्व. मंगेश पाडगांवकर यांच्या कन्या अंजली पाडगांवकर हजर होत्या. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
Comments
Add Comment