भावाबहिणीच्या प्रेमळ नात्याचे प्रतीक असलेला भाऊबीज हा सण दिवाळीनंतर लगेच साजरा केला जातो. यंदा हा सण २३ ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. या दिवशी बहिणी भावाला टिळक लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, तर भाऊ आपल्या बहिणीला खास भेट देऊन तिचा आनंद वाढवतात. जर तुम्हीही या भाऊबीजेला तुमच्या बहिणीला काहीतरी वेगळं आणि संस्मरणीय देण्याचा विचार करत असाल, तर खालील ५ ट्रेंडी गिफ्ट आयडियाज नक्की उपयोगी ठरतील.
१. पर्सनलाईज्ड ज्वेलरी: बहिणीच्या आवडीनुसार बनवलेले दागिने म्हणजेच पर्सनलाईज्ड ज्वेलरी हा एक खास पर्याय आहे. तिच्या नावाचे पहिले अक्षर, जन्मतारीख किंवा खास प्रसंगाशी जोडलेले ब्रेसलेट किंवा नेकलेस भेट देऊन तुम्ही तिला आनंदित करू शकता.
२. फोटो फ्रेम: भावनिक स्पर्श देणारा हा एक उत्तम पर्याय आहे. तुमच्या दोघांच्या आठवणींनी सजलेला कोलाज किंवा एक सुंदर फोटो फ्रेम बहिणीच्या मनाला स्पर्श करेल.
३. ट्रेंडी गॅजेट्स: आजच्या काळात तंत्रज्ञान प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनले आहे. स्मार्टवॉच, एअरबड्स किंवा टॅबलेटसारखे गॅजेट्स भेट देणे हा आधुनिक आणि उपयुक्त पर्याय आहे.
४. स्किनकेअर किंवा मेकअप हँपर: बहिणीच्या सौंदर्याची काळजी घेणारा हँपर देणे ही एक सुंदर कल्पना आहे. फेस मास्क, बॉडी लोशन, परफ्यूम, किंवा तिच्या आवडत्या मेकअप प्रॉडक्ट्सची किट भेट देऊ शकता.
५. पुस्तके आणि जर्नल: वाचनाची किंवा लेखनाची आवड असलेल्या बहिणीसाठी पुस्तक किंवा पर्सनलाईज्ड डायरी ही परिपूर्ण भेट ठरेल.
या ट्रेंडी भेटवस्तूंमुळे तुमची भाऊबीज अधिक खास बनेल आणि बहिणीच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद फुलेल.