Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

मुंबईत मोठा 'घातपात' टळला? बनावट BARC शास्त्रज्ञाच्या घरात सापडले 'अणुबॉम्ब डिझाईन'चे १४ नकाशे!

मुंबईत मोठा 'घातपात' टळला? बनावट BARC शास्त्रज्ञाच्या घरात सापडले 'अणुबॉम्ब डिझाईन'चे १४ नकाशे!

NIA आणि IB च्या संयुक्त कारवाईत अख्तर हुसेन अटकेत; राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका उघड

मुंबई: भारताचे अणु संशोधन केंद्र असलेल्या भाभा अणु संशोधन केंद्राचे (BARC) बनावट शास्त्रज्ञ म्हणून वावरणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई गुन्हे शाखेने राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि गुप्तचर विभाग (IB) यांच्या संयुक्त कारवाईत अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

या आरोपीच्या घराच्या झडतीदरम्यान तपास यंत्रणांच्या हाती थेट 'अणुबॉम्ब डिझाइन'शी संबंधित असलेले तब्बल १४ अत्यंत संवेदनशील नकाशे आणि कागदपत्रे लागली आहेत.

अणुबॉम्ब आराखड्याचे नकाशे जप्त; सुरक्षा यंत्रणा सतर्क

अटक करण्यात आलेल्या अख्तरच्या निवासस्थानाची झडती घेतली असता, पोलिसांना 'अणुबॉम्बच्या आराखड्याशी' संबंधित असल्याचा गंभीर संशय असलेले हे १४ नकाशे आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली. या अत्यंत संवेदनशील दस्तऐवजांच्या जप्तीमुळे राष्ट्रीय सुरक्षेला असलेला संभाव्य गंभीर धोका उघड झाला आहे.

या नकाशांचा स्रोत आणि उद्देश काय होता?

हे नकाशे आरोपी अख्तर हुसेनकडे कसे आणि कुठून आले?

या माध्यमातून BARC मध्ये मोठा घातपाताचा कट रचला जात होता का?

या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी गुप्तचर आणि तपास यंत्रणांनी बहुआयामी तपास सुरू केला आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणातील आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्याची आणि अधिक जणांना अटक होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) चे महत्त्व

भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) हे मुंबईतील ट्रॉम्बे येथे स्थित असून ते भारताचे प्रमुख अणु संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाचे केंद्र आहे. डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी १९५४ मध्ये 'अॅटॉमिक एनर्जी इस्टॅब्लिशमेंट, ट्रॉम्बे' (AEET) या नावाने याची स्थापना केली होती.

BARC ने अणुऊर्जेची निर्मिती, अण्वस्त्र तंत्रज्ञान आणि शांततामय उपयोगासाठी रेडिओआयसोटोप्सचे उत्पादन यासह अनेक क्षेत्रांत देशाला स्वावलंबी बनवले आहे. देशाच्या संरक्षण आणि वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे या केंद्राचे बनावट शास्त्रज्ञ बनून संवेदनशील नकाशे बाळगणे ही बाब राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा