'अभंग तुकाराम' चित्रपटात हा कलाकार दिसणार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

मुंबई : काही प्रतिभावान कलावंतांनी कठोर मेहनतीच्या बळावर इतिहासाच्या पानांमधील व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावरही अजरामर केल्या आहेत. त्यांचीच परंपरा पुढे सुरू ठेवत आता अभिनेता अजिंक्य राऊत प्रथमच मोठ्या पडद्यावर एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व्यक्तीरेखेत दिसणार आहे. आगामी 'अभंग तुकाराम' या चित्रपटात तरुण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तो साकारणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’ चित्रपट ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, अजय अशोक पूरकर, दिग्पाल लांजेकर असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत.

अजिंक्यने विविध मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले असून त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं होतं. या नव्या भूमिकेविषयी विषयी सांगताना अजिंक्य राऊत म्हणाला की, आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्यचं समजतो. ‘छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. ही व्यक्तिरेखा साकारताना जबाबदारीच भान असावं लागतं. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण टीमने ही मला उत्त्तम सहकार्य केलं आहे.

तुकारामांच्या अभंगांमध्ये अध्यात्मिकतेचा साक्षात्कार आणि जीवनाची अर्थपूर्णता याचं अत्यंत सुंदर सार दडलेलं आहे. हेच सार ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटातून आपल्या समोर मांडण्यात येणार आहे.

चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे असून, दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाचे छायांकन संदीप शिंदे यांचे आहे. संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा सौरभ कांबळे यांची आहे. संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. ध्वनी आरेखन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर यांचे आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शन सुमित साळुंखे तर कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. निर्मिती पश्चात प्रक्रिया सचिन भिल्लारे यांची आहे. व्ही एफ. एक्स ची जबाबदारी शॉक अँड ऑ फिल्म्स यांनी तर व्हिजुअल प्रमोशनची जबाबदारी कॅटलिस्ट क्रिएटस यांनी सांभाळली आहे. सिनेमन एंटरटेनमेंटचे जय गोटेचा मार्केटिंग डायरेक्टर आहेत. कार्यकारी निर्मात्या केतकी गद्रे अभ्यंकर आहेत.
Comments
Add Comment

झुबीन गर्गनंतर संगीत क्षेत्राला आणखी एक धक्का

नवी दिल्ली : गायक आणि अभिनेता ऋषभ टंडन (३५) याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पापाराझी (सेलिब्रेटींचा

'राजा शिवाजी' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मोठी घटना! दिग्दर्शक रितेश देशमुखने दिलेले वचन केले पूर्ण

सातारा: अभिनेता रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' या आगामी चित्रपटाच्या दरम्यान एका कलाकाराचा मृत्यू झाला. सौरभ शर्मा

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नटरंगच्या १५ वर्षांनंतर येणार हा नवा चित्रपट ; दिगदर्शक रवी जाधव यांची घोषणा

मुंबई : नटरंग हा मराठी चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपटातील

बॉलिवूडने गमावला एक महान विनोदी अभिनेता

मुंबई : हिंदी सिनेमाच्या जगतात आपल्या खास विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ

अ‍ॅटलीच्या आगामी सिनेमात दिसणार दीपिका आणि अल्लू अर्जुन... यावर काय म्हणाला रणवीर सिंह

मुंबई : जवान फेम दाक्षिणात्य दिग्दर्शक अ‍ॅटलीच्या आगामी चित्रपटात दीपिका पदुकोण आणि अल्लू अर्जुन दिसणार आहेत

अभिनेत्री काजोलचे कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांना दुखावणारे वक्तव्य, उफाळला नवा नाद

मुंबई : सध्या बॉलीवूडच्या अभिनेत्री त्यांच्या कामाच्या वेळेबद्दल काही ना काही वक्तव्य करत आहेत. सर्वात आधी