
मुंबई: दादर येथील कबुतरखान्याचा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून दादर येथील कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन समाज आक्रमक झाला आहे. त्यात जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी कबुतरखान्याच्या बंदीविरोधात या आधी शस्त्र उचलण्याची भाषा केली होती. मात्र आता आमरण उपोषण करणार असा नारा दिला आहे. तसेच उपोषणाला बसण्याची तारीखसुद्धा जाहीर केली आहे. जैन समूदायाच्या या भूमिकेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झाली आहे. 'कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान' अशा आशयाचे फलक लावून त्यांनी जैन समूदायाच्या भूमिकेचा निषेध केला आहे.

पुणे: यावर्षी दिवाळीला गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी पुणे एसटी विभागातून दि. १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान जादा बस सोडण्यात आल्या होत्या. या तीन दिवसांत ...
महापालिकेने कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कबुतरखान्यावरून पुन्हा एकदा वाद चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत. यापूर्वी कबुतरखान्यांच्या बंदीच्या निषेधार्थ जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी शस्त्र उचलण्याचाही इशारा दिला होता. आता मात्र त्यांनी शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर ते आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत.
एकीकडे सर्वसामान्य मुंबईकरांचा कबुतरखान्याला विरोध असताना दुसरीकडे जैन समूदाय मात्र कबुतरखाना सुरू करण्यासाठी अडून बसल्याचे चित्र आहे. दादरमधील कबुतरखाना बंद केल्यानंतर अनेक कबुतरांचा मृत्यू झाल्याचे सांगत जैन समूदायाने ११ ऑक्टोबर रोजी कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. मुंबईतील कबूतरखाने पुन्हा सुरू व्हावेत, अशी मागणी देखील या प्रार्थनासभेतून करण्यात आली.