शिर्डी : दिवाळीनिमित्त शिर्डीत साईबाबांच्या मूर्तीला साई संस्थानच्या वतीने पाच कोटी रुपये किंमतीच्या सोन्याच्या तसेच हिऱ्यांच्या अलंकारांनी सजवण्यात करण्यात आला. याप्रसंगी साईंच्या मूर्तीला पाच कोटी रुपये किंमतीच्या अलंकारांनी सजवले. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन झाले. श्रीगणेश पूजन, लक्ष्मी-कूबेर पूजन, सरस्वती पूजन साई धूप-नैवेद्य दाखवणे आदी पूजाविधी संपन्न झाले. याप्रसंगी साई संस्थानचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच ग्रामस्थ आणि साईभक्त उपस्थित होते.

लक्ष्मी-कूबेर पूजन झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता श्रींची धुपारती झाली. धुपारतीनंतर साईभक्तांसाठी दर्शन रांग सुरु करण्यात आली. दिवाळीनिमित्त साईबाबा मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच साईबाबा समाधी मंदिर आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. भाविकांनी मंदिरात तेलाचे दिवे लावले. सोन्याच्या ताटातून साईंना पिठलं-भाकर-कांदा असा नैवेद्य दाखवण्यात आला.