मुंबई : कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईहून कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या देशातील सर्वात वेगवान ट्रेनपैकी एक असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, कोचची (डब्यांची) संख्या वाढवण्यासोबतच तिच्या फेऱ्यांची संख्याही वाढवण्याचा निर्णय झाला आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आता आठवड्यातून सहा दिवस चालवली जाणार आहे. या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आता १६ कोच अर्थात डबे असतील. यामुळे एकाचवेळी अनेकांना प्रवास करणे शक्य होणार आहे.
सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार असे आठवड्यातील सहा दिवस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही १६ कोचची गाडी धावणार आहे. हा बदल २२ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आला आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचे नवे वेळापत्रक (२२ ऑक्टोबर २०२५ पासून लागू)
ट्रेन क्रमांक 22229 (मुंबई CSMT ते मडगाव, गोवा) - मुंबई CSMT येथून सकाळी ५.२५ वाजता सुटेल आणि मडगाव (गोवा) स्टेशनवर दुपारी १.१० वाजता पोहचेल.
ट्रेन संख्या 22230 (मडगाव, गोवा ते मुंबई CSMT) - मडगाव येथून दुपारी २.४० वाजता सुटेल आणि मुंबई CSMT येथे रात्री १०.३० वाजता पोहचेल.






