Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

सलग १५ दिवस बीट ज्युस प्यायल्यास होणार 'या' ५ लोकांना आरोग्यदायी फायदे

सलग १५ दिवस बीट ज्युस प्यायल्यास होणार 'या' ५ लोकांना आरोग्यदायी फायदे

बीट हे एक पोषकद्रव्यांनी भरलेले कंदमूळ आहे, जे डाएटमध्ये समाविष्ट केल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. सलग १५ दिवस बीट ज्युस प्यायल्यास शरीरातील ऊर्जा वाढते, त्वचा तेजस्वी होते, यकृताचे संरक्षण होते आणि वेटलॉसमध्येही मदत होते. बीटमध्ये मॅग्नीज, पोटॅशिअम, लोह, फॉलेट, व्हिटॅमिन बी ६ आणि व्हिटॅमिन सी यांसारखी पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात.

घरच्या घरी बीट ज्युस कसा बनवावा?

सामग्री :

  • बीट
  • पाणी
  • लिंबाचा रस (पर्यायी)

बीट ज्युस तयार करण्याची प्रक्रिया

  • बीट स्वच्छ धुऊन त्याची साल काढा.
  • नंतर छोटे तुकडे करून ज्युसर किंवा मिक्सरमध्ये वाटून ज्युस काढा.
  • जाडसर असल्यास थोडे पाणी घालावे.
  • चवीसाठी लिंबाचा रस घाला
  • ही सोपी पद्धत तुम्हाला पौष्टिक बीट ज्युस लवकरच तयार करून देते.

बीट ज्युसचे आरोग्यदायी फायदे

  • यकृताचे संरक्षण - बीट ज्युस यकृतातील सूज कमी करतो आणि यकृताचे रक्षण करतो.
  • त्वचा आणि सौंदर्य - अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेला नैसर्गिक तेज देतात.
  • ऊर्जा वाढवतो - दिवसभर काम करताना किंवा व्यायामानंतर थकवा जाणवत असेल तर बीट ज्युस ऊर्जा वाढवतो.
  • वजन कमी करण्यास मदत - कमी कॅलरी, कमी फॅट्स आणि जास्त फायबरमुळे वेटलॉस डाएटसाठी उपयुक्त.
  • कोलेस्टेरॉल नियंत्रित करतो - फायटोन्युट्रिएंट्स खराब कोलेस्टेरॉल कमी करतात, हृदयाचे आरोग्य सुधारतात.

बीट ज्युस हा नैसर्गिक, पौष्टिक आणि घरच्या घरी सहज तयार होणारा पेय म्हणून डाएटमध्ये समाविष्ट करणे अत्यंत फायदेशीर ठरते. दररोज १ ग्लास बीट ज्युस प्यायल्यास शरीरातील पोषणतत्त्वांचा समतोल राखण्यास मदत मिळते आणि संपूर्ण आरोग्य सुधारते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >