Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

भारतीय अवकाश संशोधनातील सोन्याचे पान काळाच्या पडद्याआड, डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन

भारतीय अवकाश संशोधनातील सोन्याचे पान काळाच्या पडद्याआड, डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन

मुंबई: भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस यांचे आज बुधवार, २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. सॅटेलाइट टीव्हीच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश देशाच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोहोचवण्यात प्रा.एकनाथ वसंत चिटणीस यांचा सिंहाचा वाटा आहे. २६ जुलै २०२५ ला त्यांनी आपला शतकमहोत्सवी वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या कार्यासाठी त्यांना पद्मभुषणसह इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

डॉ. एकनाथ चिटणीस यांनी भारतीय अंतराळ संशोधनाचा पाया रचणाऱ्या डॉ. विक्रम साराभाई यांच्या सोबत सहकारी म्हणून काम केले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत डॉ. अब्दुल कलाम यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवायची याचा निर्णयही चिटणीस यांनी घेतला होता. श्रीहरीकोटा येथील अग्निबाण प्रक्षेपण केंद्राची जागा त्यांनीच निश्चित केली होती.

१९५० मध्ये पुण्यातील इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये विक्रम साराभाईंचे प्रेरणादायी भाषण ऐकून त्यांनी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कॉस्मिक किरणांवरील संशोधनासाठी सेरेन्कॉव्ह काउंटर तयार केला आणि पुढे एमआयटीमध्ये प्रा. ब्रुनो रॉसी यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. १९६१ मध्ये साराभाईंनी भारतात परत बोलावल्यावर चिटणीस यांनी देशातील पहिली सॅटेलाइट टेलिमेट्री स्टेशन उभारले. तसेच थुंबा रॉकेट लॉंचिंग स्टेशनची निवड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९६३ मध्ये भारताच्या पहिल्या Nike Apache रॉकेटच्या उड्डाणाचे त्यांचे स्वप्न साकार झाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >