मुंबई : दिवाळीत किल्ला बनवण्यामागे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा आदर करणे, शौर्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक म्हणून हे मनामध्ये रुजवणे, आणि मुलांना ऐतिहासिक जाणीव करून देणे ही प्रमुख कारणे आहेत. या प्रथेमुळे मुलांमध्ये कणखरपणा, शौर्य आणि सर्जनशीलता वाढते, तसेच ही एक आनंददायक आणि विरंगुळ्याची कृती आहे.
किल्ला हे शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक मानले जाते. दिवाळीत किल्ला बनवून महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदराने सन्मान केला जातो. येणाऱ्या पिढ्यांमध्ये कणखरपणा जावा आणि शिवकालीन स्वराज्याची कल्पना रुजावी यासाठी दिवाळीत किल्ला बांधण्याची प्रथा सुरू झाली. मुलांना किल्ला बनवताना सिंहासनावर शिवाजी महाराज आणि मावळ्यांची प्रतिष्ठापना करून त्यांच्या शौर्याची आठवण करून दिली जाते.
दिवाळीत किल्ला बांधल्याने मनात सकारात्मकतेची भावना निर्माण होते, असे मानले जाते. किल्ला बनवण्यासाठी आयुष तांबे, अंश वाघ, पार्थ बिडवे, अनन्य सुरडकर, अभिषेक देशमुख, शुभम कुंभार, आदित्य देशमुख, चैतन्य सुरडकर,यांचा मोलाचा वाटा आहे. अशी माहिती तृतीय श्रेणी संघटनेचे अध्यक्ष सुरेश तांबे यांनी दिली.