
अकोला : संपूर्ण राज्यासह देशभरात दिवाळीचा (Diwali) उत्साह ओसंडून वाहत असताना, अकोल्यात मात्र लक्ष्मीपूजनाच्या रात्री एका भीषण अपघातामुळे सणाला गालबोट लागले. अकोला – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) पैलपाडा गावाजवळ ही अत्यंत दुःखद घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या चार जणांना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली आणि त्यांना चिरडले. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये अश्विनी शिरसाट आणि धिरज शिरसाठ या पती-पत्नीचा समावेश आहे, तसेच आरिफ खान यांनाही आपला जीव गमवावा लागला. तर, अन्वर खान हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) उपचार सुरू आहेत. सणासुदीच्या दिवशीच तिघांवर काळाने घाला घातल्यामुळे सर्वत्र प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे आणि मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

सोनीपत : संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह (Diwali Celebration) असताना, कंपन्या आणि कारखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांकडून बोनसची अपेक्षा केली जात आहे. अनेक ठिकाणी ...
बंद पडलेल्या कारजवळ अपघात: नेमकं काय घडलं?
अकोला – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पैलपाडा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगावमंजू येथील रहिवासी असलेले धीरज सिरसाट आणि अश्विनी सिरसाट हे जोडपे त्यांचे काम आटोपून त्यांच्या चारचाकी गाडीने (Four-wheeler) घरी परतत होते. रस्त्यात अचानक त्यांची कार बंद पडली. त्यानंतर त्यांनी मदतीसाठी फोन केला आणि त्यांची बंद पडलेली कार एका मालवाहू गाडीने (Goods Vehicle) टोचन (Towing) करून नेली जात होती. पैलपाडा गावाजवळ पोहोचल्यानंतर, गाडीतून चौघे जण खाली उतरले. ते रस्त्याच्या बाजूला उभे राहून गाडीचे टायर्स (Tyres) तपासत होते. नेमक्या याच वेळी, अमरावतीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात गाडीने त्यांना जोराची धडक दिली आणि त्यांना चिरडले. धडक इतकी जबर होती की, चौघेही गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. या अपघातात धीरज सिरसाट आणि अश्विनी सिरसाट या दांपत्यासह आरिफ खान (सर्व बोरगावमंजूचे रहिवासी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, चौथा व्यक्ती अन्वर खान हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गंभीर अपघाताप्रकरणी बोरगावमंजू पोलिस अधिक तपास करत आहेत.