Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

एअर इंडियाचे अमेरिकेला निघालेले विमान टेक-ऑफनंतर मुंबईत परतले; तांत्रिक बिघाडाची सात दिवसांतील दुसरी घटना

एअर इंडियाचे अमेरिकेला निघालेले विमान टेक-ऑफनंतर मुंबईत परतले; तांत्रिक बिघाडाची सात दिवसांतील दुसरी घटना

मुंबई: एअर इंडियाच्या मुंबईहून अमेरिकेतील नेवार्क शहराकडे जाणाऱ्या विमानाला (फ्लाइट AI191) टेक-ऑफनंतर तांत्रिक बिघाडाच्या संशयामुळे मुंबई विमानतळावर तातडीने परतावे लागले. बुधवारी (२२ ऑक्टोबर) ही घटना घडल्याचे एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

एअर इंडियाने म्हटले आहे की, "मुंबईहून नेवार्कला जाणाऱ्या फ्लाइट AI191 च्या क्रूने तांत्रिक समस्येच्या संशयावरून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईला परतीचा निर्णय घेतला. विमान सुरक्षितपणे मुंबईत उतरले असून, त्याची आवश्यक तपासणी सुरू आहे."

या विमानाचे नियोजित वेळापत्रक भारतीय वेळेनुसार पहाटे १:१० वाजता मुंबईतून सुटायचे आणि ते सकाळी ७:५५ वाजता नेवार्कला पोहोचायचे होते. परंतू ही सेवा रद्द झाल्यामुळे नेवार्कहून मुंबईला येणारी परतीची फ्लाइट AI144 देखील रद्द करण्यात आली आहे.

सात दिवसांतील दुसरी घटना

अवघ्या काही दिवसांतील एअर इंडियाची ही दुसरी घटना आहे. गेल्या शुक्रवारी मिलान (इटली) विमानतळावर दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान तांत्रिक बिघाडामुळे अडकले होते. या घटनेमुळे दिवाळीपूर्वी २५० हून अधिक प्रवाशी परदेशात अडकले होते. त्या विमानातील प्रवाशांना परत आणण्यासाठी १९ ऑक्टोबर रोजी एअर इंडियाने मिलानहून दिल्लीसाठी अतिरिक्त फ्लाईट चालवली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >