
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटातील नेता भाजपमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदार संघात ठाकरे गटाकडून लढलेले उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने हे भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्नशील आहेत, असे उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. त्यामुळे रत्नागिरीच्या राजकरणात खळबळ निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे गटाला एकामागून एक असे धक्के बसले आहेत. राज्यभरातील अनेक नेत्यांनी उबाठा गटाला 'जय महाराष्ट्र' करत महायुतीतील घटक पक्षांमध्ये प्रवेश केलाय. यामध्ये आता रत्नागिरी मतदारसंघातील नेताही भाजपमध्ये जाणार आहे. यामुळे रत्नागिरीच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

नवी मुंबई: नवी मुंबईतील कामोठे परिसरात एका घरात लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आग लागल्याची ...
उदय सामंत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीतून ठाकरे गटाकडून लढलेले उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने हे भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्नशील आहे. त्यांच्या भाजप प्रवेशासाठी हालचाली सुरू आहेत," असा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना सामंत म्हणाले की, "महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. योग्य वेळी आमचे तीन नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तो जाहीर करतील. त्यामुळे विधानसभेप्रमाणे आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील मोठं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे