Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

मंडला ते चेंबूर हा मेट्रो २ बीचा पहिला टप्पा सुरू होणार

मंडला ते चेंबूर हा मेट्रो  २ बीचा पहिला टप्पा सुरू होणार

मुंबई  : मुंबईमध्ये लवकरच आणखी एक मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महिन्यातच उद्घाटन होणार होते. पण काम पूर्ण झाले नसल्याने उद्घाटन सुरू झाले नाही. पण आता मेट्रोच्या २ बीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मंडला ते चेंबूर हा मेट्रो मार्ग या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. या मार्गकेमुळे मंडला ते चेंबूर प्रवास जलद होणार आहे.

मेट्रो २ बी चा पहिला टप्पा सुरू करत मुंबईकरांना खूशखबर देण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. मेट्रो-३ कॉरिडोरनंतर एमएमआरडीएकडून मेट्रो-२ बी चा पहिला टप्पा सुरू करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या माहितीनुसार, मेट्रो २ बी मधील मंडाला (मानखुर्द) ते डायमंड गार्डन मार्ग (चेंबूर) पर्यंत मेट्रो धावणार आहे. यासाठी सीएमआरएसकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

पहिल्या टप्प्यात ५.६ किमीचा मार्ग सुरू करण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो रेल्वे सेफ्टी बोर्डाकडून (सीएमआरएस) अनिवार्य सर्टिफिकेट मिळवले आहे. सध्या साफ-सफाई अन् पेटिंगचे काम सुरू आहे. पुढील १० ते १५ दिवसात हे काम पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर अखेरपर्यंत मेट्रो २ बी सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू होईल. एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी शनिवारी मेट्रो २ बी चा आढावा घेतला. या मार्गावर एप्रिल २०२५ पासून चाचपणी सुरू होती. आता पुढील १५ दिवसात मेट्रोचा हा मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रोचा हा मार्ग खुला करण्यात येईल.

डीएन नगर ते मंडाला यादरम्यान २३.६ किमी लांब मेट्रो मार्ग सुरू होत आहे. या मार्गावरील सिव्हिल काम अद्याप पूर्ण झालेले नाही. यामुळे सध्या पहिल्या टप्प्यात ५.६ किमी मार्गावर मेट्रो सुरू करण्यात येत आहे. या मार्गावर मंडाला, मानखुर्द, बीएसएनएल, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डायमंड गार्डन ही स्टेशन असतील.

Comments
Add Comment