‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Marathi Movie: ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ आणि ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर निर्माती क्षिती जोग आणि लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यांच्या नव्या चित्रपटाचं नाव आहे ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’, आणि हा चित्रपट १ जानेवारी २०२६ पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नुकताच सोशल मीडियावर या चित्रपटाचा घोषणा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला असून, "आता मराठी शाळा पुन्हा भरणार!" या घोषवाक्यासह नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना एक सुंदर भेट देण्याची तयारी सुरु आहे.


हा चित्रपट मराठी शाळांची घटती संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व आणि मराठी भाषेबद्दलचा अभिमान या अत्यंत भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर आधारित आहे. शिक्षणाच्या व्यावसायिकीकरणाच्या युगात आपल्या मातृभाषेतील शिक्षणाचे मूल्य पुन्हा अधोरेखित करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडेल, असं बोललं जात आहे.


चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची प्रभावी फळी पाहायला मिळणार आहे. यात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर हे लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. विशेष म्हणजे, यूट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिचं हे मराठी चित्रपटसृष्टीतील पहिलं पदार्पण आहे.


दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, “हा विषय माझ्या मनाच्या अगदी जवळचा आहे. मराठी शाळा म्हणजे आपली ओळख आहे. त्या केवळ शिक्षणाचे केंद्र नसून संस्कार, संस्कृती आणि स्वाभिमानाची पाळंमुळं आहेत. या चित्रपटातून आम्ही मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.”


क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित हा चित्रपट नववर्षाच्या शुभारंभी प्रेक्षकांना भाषेचा आणि शिक्षणाचा नवा अर्थ समजावणारा ठरेल, अशी सर्वत्र चर्चा आहे.

Comments
Add Comment

‘तो ती आणि फुजी’ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुपरहिट

पुणे : शिलादित्य बोरा निर्मित आणि मोहित टकळकर दिग्दर्शित मराठी–जापानी चित्रपट ‘तो ती आणि फुजी’चा २४व्या पुणे

साईबाबांच्या पालखीच्या प्रवासातील साई भक्तांच्या अढळ श्रद्धेवर आणि भक्तीवर आधारित , 'पालखी' चित्रपटाचा मुहूर्त

मुंबई : श्रद्धा ही केवळ भावना नाही, ती आयुष्याला नवी दिशा देणारी शक्ती आहे. साईबाबांच्या कृपेवर आणि अढळ

करण जौहरचा चित्रपट ऑस्कर 2026 मधुन बाहेर;चाहत्यांमध्ये निराशा..

मुंबई :ऑस्कर २०२६, ९८व्या अकॅडमी अवॉर्ड्सच्या नामांकनांची अधिकृत यादी जाहीर झाली असून, भारताकडून अधिकृत प्रवेश

भय आणि भ्रमाच्या विळख्यातला थरार ‘सालबर्डी’

मुंबई : इतिहासाच्या गर्भात दडलेल्या अनेक रहस्यांचा कधीच शोध लागत नाही, ती नेहमीच अनुत्तरीतच रहातात. काहींचा शोध

मराठी मनोरंजनाचा समृद्ध खजिना घेऊन 'नाफा स्ट्रीम'ची नॉर्थ अमेरिकेत धडाकेबाज एंट्री!

सॅन होजे (मनोरंजन प्रतिनिधी) : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या गाजलेल्या चित्रपटांचे

फरहान अख्तर अभिनीत ‘120 बहादूर’पासून सनी देओलच्या ‘बॉर्डर’पर्यंत – या प्रजासत्ताक दिनी पाहा 7 देशभक्तीपर चित्रपट

प्रजासत्ताक दिन विशेष: फरहान अख्तर अभिनीत ‘120 बहादूर’पासून सनी देओलच्या ‘बॉर्डर’पर्यंत – हे सात प्रेरणादायी