१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) हाणून पाडला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात अवैधरीत्या चिनी फटाके आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तस्कर टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून, सुमारे १० कोटी रुपये किमतीचे तब्बल १.३० लाख फटाके जप्त करण्यात आले आहेत.


'ऑपरेशन फायर ट्रेल' या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, देशातील दोन प्रमुख बंदरांवरून ही तस्करी उघडकीस आली आहे.


डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी न्हावा शेवा बंदरात चीनहून आलेल्या एका कंटेनरची कसून तपासणी केली. यामध्ये वरच्या थरावर कपडे ठेवले होते, पण खोलवर पाहणी केल्यानंतर ४६,६४० चिनी फटाके आढळून आले. या खेपाची अंदाजित किंमत ४.८२ कोटी रुपये आहे.


तपासाअंती या तस्करीमागे असलेल्या टोळीचा शोध लागला असून, गुजरातमधील वेरावळ येथे एका मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे. या टोळीच्या ताब्यातून बेकायदेशीर कागदपत्रे आणि साठवणूक यंत्रणेचे पुरावे देखील हस्तगत करण्यात आले आहेत.


याचप्रमाणे, तुतिकोरिन बंदरावर देखील डीआरआयने दुसऱ्या कारवाईत ८३,५२० चिनी फटाके जप्त केले आहेत. या फटाक्यांना 'इंजिनिअरिंग गुड्स' म्हणून चुकीचं लेबल लावून देशात आणण्याचा प्रयत्न केला जात होता. हे फटाके सिलिकॉन सीलंट गनच्या झाकणाखाली लपवण्यात आले होते. ही खेप सुमारे ५.०१ कोटी रुपये किमतीची होती.


अशा प्रकारच्या बेकायदेशीर आयातीवर बंदी आहे. विदेश व्यापार धोरणानुसार फटाक्यांची आयात प्रतिबंधित असून, त्यासाठी डीजीएफटी आणि पेट्रोलियम व स्फोटक सुरक्षा संघटनेच्या मान्यतेची आवश्यकता असते.


अशा धोकादायक वस्तूंची आयात केवळ कायदाविरोधीच नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेसाठीही गंभीर धोका ठरू शकते. डीआरआयच्या या सतर्क कारवाईमुळे, सणासुदीच्या काळात देशात अवैध चिनी फटाके पोहोचण्यापासून रोखण्यात यश मिळालं आहे.

Comments
Add Comment

कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, प्रजासत्ताक दिनी दिसले देशाचे सामर्थ्य

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात

मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

पंचम' डिजिटल चॅटबॉट लाँच, घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे मार्गी लागणार

नवी दिल्ली : गावांमधील प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने

तामिळनाडूमध्ये हिंदीवर बंदीच राहणार, मुख्यमंत्री स्टॅलिनचा केंद्राला स्पष्ट इशारा

चेन्नई : तामिळनाडूमध्ये हिंदी लादण्यास कुठलेही स्थान नाही आणि कधीही होणार नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि

तेजस्वी यादव आरजेडीचे कार्यकारी अध्यक्ष

पाटणा: पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा निर्णय घेतला असून

महाराष्ट्र 'पद्म'मय, 'पद्मविभूषण'सह १५ पुरस्कारांवर राज्याची मोहोर

धर्मेंद्र यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण , अलका याज्ञिक यांना 'पद्मभूषण'तर रोहित शर्माला 'पद्मश्री' तारपा सम्राट'