राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचा आहे.


राष्ट्रपती मुर्मू २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे पोहोचतील. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ ऑक्टोबर रोजी त्या प्रसिद्ध शबरीमला मंदिरात दर्शन आणि आरती करतील. या भेटीला विशेष धार्मिक महत्त्व असून राज्यभरात तिची उत्सुकता आहे.


राष्ट्रपती २३ ऑक्टोबर रोजी राजभवनात भारताचे माजी राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करतील. हा कार्यक्रम माजी राष्ट्रपतींच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाला अभिवादन करणारा आहे. त्याच दिवशी त्या वर्कला येथील शिवगिरी मठात नारायण गुरु यांच्या महासमाधी शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहतील. या कार्यक्रमाद्वारे सामाजिक एकता, शिक्षण आणि आध्यात्मिकतेच्या विचारांना प्रोत्साहन देण्याचा संदेश दिला जाणार आहे. यानंतर राष्ट्रपती पलाई येथील सेंट थॉमस कॉलेजच्या प्लॅटिनम ज्युबिली समारोप समारंभाला उपस्थित राहतील. यानंतर २४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती एर्नाकुलम येथील सेंट टेरेसा कॉलेजच्या शताब्दी समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होतील. हे कॉलेज महिला शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी ओळखले जाते.


केरळ सरकार आणि स्थानिक प्रशासन राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या स्वागत आणि सुरक्षेच्या तयारीत व्यस्त आहे. नागरिक आणि विद्यार्थी वर्गामध्ये राष्ट्रपतींच्या आगमनाबद्दल उत्साहाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, प्रजासत्ताक दिनी दिसले देशाचे सामर्थ्य

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात

मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

पंचम' डिजिटल चॅटबॉट लाँच, घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे मार्गी लागणार

नवी दिल्ली : गावांमधील प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने

तामिळनाडूमध्ये हिंदीवर बंदीच राहणार, मुख्यमंत्री स्टॅलिनचा केंद्राला स्पष्ट इशारा

चेन्नई : तामिळनाडूमध्ये हिंदी लादण्यास कुठलेही स्थान नाही आणि कधीही होणार नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि

तेजस्वी यादव आरजेडीचे कार्यकारी अध्यक्ष

पाटणा: पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा निर्णय घेतला असून

महाराष्ट्र 'पद्म'मय, 'पद्मविभूषण'सह १५ पुरस्कारांवर राज्याची मोहोर

धर्मेंद्र यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण , अलका याज्ञिक यांना 'पद्मभूषण'तर रोहित शर्माला 'पद्मश्री' तारपा सम्राट'