विषारी कफ सिरप प्रकरणात ‘कोल्ड्रिफ’ कंपनीचा मालक न्यायालयीन कोठडीत

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात २० हून अधिक निष्पाप बालकांचा बळी घेणाऱ्या विषारी कफ सिरप ‘कोल्ड्रिफ’ प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या सिरपचे उत्पादन करणाऱ्या तामिळनाडूस्थित श्रीसेन फार्मा कंपनीचे मालक रंगनाथन गोविंदन यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे.


या प्रकरणात गोविंदन यांना यापूर्वी १० दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. या दरम्यान विशेष तपास पथक (SIT) ने त्यांची चौकशी तामिळनाडूतील कांचीपुरम येथे केली. कोठडी संपल्यानंतर त्यांना परसिया येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश गौतम गुर्जर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने रंगनाथन गोविंदन यांना न्यायालयीन कोठडी दिली.


SIT प्रमुख जितेंद्र सिंग जाट यांनी सांगितले की, या प्रकरणात छिंदवाडातील डॉ. प्रवीण सोनी, घाऊक औषध विक्रेता राजेश सोनी आणि डॉ. सोनी यांच्या पत्नीच्या मेडिकल स्टोअरमधील फार्मासिस्ट सौरभ जैन हे तिघेही आधीच कोठडीत आहेत. तपासात उघड झाले आहे की ‘कोल्ड्रिफ’ सिरप प्यायल्यानंतर अनेक मुलांच्या किडनी निकामी झाल्या आणि त्यामुळे मृत्यू झाले.


या धक्कादायक घटनेनंतर सरकारने तत्काळ पावले उचलली आहेत. राज्य सरकारने दोन औषध निरीक्षक आणि FDAचे उपसंचालक यांना निलंबित केले असून, राज्याच्या औषध नियंत्रकाची बदली करण्यात आली आहे. तसेच, संबंधित औषध उत्पादन युनिट सील करण्यात आले आहे.


दरम्यान, स्थानिक न्यायालयाने डॉ. सोनी यांचा जामीन अर्ज फेटाळला असून त्यांनी आता मध्य प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणामुळे औषधनिर्मिती क्षेत्रातील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, सरकारकडून भविष्यात कडक कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

संगमनेरमध्ये ९५०० बोगस मतदारांची नोंद!

बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक आरोप संगमनेर : संगमनेर विधानसभा निवडणुकीत साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद झाली

सलग आगीच्या घटनांनी खळबळ! नवी मुंबई व पनवेलकर चिंतेत

रायगड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व पनवेल परिसरात सलग लागलेल्या दोन आगीच्या घटनांनी नागरिकांमध्ये

राजगडची उमराटकर वस्ती उजळली; तब्बल ७८ वर्षांनी वीज मिळाली

पुणे : राजगडच्या दुर्गम वस्त्यांमध्ये तब्बल ७८ वर्षांनी वीज आली आहे. उमराटकर-मोरे वस्तीला जणू काही दिवाळी भेट

संजय दत्तची लेक इकरा आहे हुबेहूब आजी नरगिस दत्त यांची 'कार्बन कॉपी'!

११ व्या वाढदिवसाच्या फोटोंवर चाहत्यांकडून 'कार्बन कॉपी' म्हणत कौतुकाचा वर्षाव मुलगा शाहरान आणि मुलगी इकराच्या

'राजा शिवाजी' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मोठी घटना! दिग्दर्शक रितेश देशमुखने दिलेले वचन केले पूर्ण

सातारा: अभिनेता रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' या आगामी चित्रपटाच्या दरम्यान एका कलाकाराचा मृत्यू झाला. सौरभ शर्मा

बुद्धिबळ जगताला धक्का, ग्रँडमास्टर डॅनियल नारोडित्स्की यांचे २९व्या वर्षी निधन

शार्लोट चेस सेंटर : प्रसिद्ध अमेरिकन बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि ऑनलाइन प्रशिक्षक डॅनियल नारोडित्स्की यांचे