दह्यात मिसळा ही एकच गोष्ट, खराब कोलेस्टेरॉल होईल झटक्यात कमी

How To Control Bad Cholesterol: आजच्या धावपळीच्या आणि असंतुलित आहाराच्या जीवनशैलीमुळे अनेकांना आरोग्यविषयक समस्या भेडसावत आहेत. त्यातलाच एक मोठा धोका म्हणजे शरीरात वाढणारी खराब कोलेस्टेरॉलची (LDL) पातळी. तेलकट, तिखट आणि जंकफुडच्या अति सेवनामुळे रक्तातील LDL वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. पण या समस्येवर घरगुती आणि नैसर्गिक उपाय म्हणून दही आणि अळशीच्या बियांचे सेवन अतिशय परिणामकारक ठरते.


अळशीच्या बियांमध्ये विघटनशील फायबर असते, जे आतड्यांमधील खराब कोलेस्टेरॉल शोषून घेतं आणि ते शरीरातून बाहेर टाकण्यास मदत करतं. तसेच, अळशीमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असते, जे हृदयाचे आरोग्य टिकवून ठेवतं आणि शरीरातील सूज कमी करतं. या बियांमध्ये असलेले लिग्नन्स कम्पाउंड अँटी-ऑक्सिडंट्सने भरलेले असते, जे रक्तातील चरबीचे प्रमाण संतुलित ठेवते आणि खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.


दुसरीकडे, दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुधारतात आणि आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन राखतात. दही आणि अळशी एकत्र सेवन केल्यास शरीरातील चांगले कोलेस्टेरॉल (HDL) वाढते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.


सेवनाची पद्धत:


थोड्या अळशीच्या बिया तव्यावर हलक्या भाजून घ्या. नंतर त्यांची बारीक पावडर करून ठेवा. दररोज एक वाटी ताज्या दह्यामध्ये एक ते दोन चमचे अळशी पावडर मिसळा आणि सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारी सेवन करा. नियमित सेवन केल्यास काही आठवड्यांत कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतो आणि शरीर हलकं, ताजेतवाने वाटतं.


नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि या घरगुती उपायाचा समावेश केल्यास हृदयाचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राखता येते.

Comments
Add Comment

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी

Nashik : नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी नाशिक जिल्ह्यात १० हजार पक्षी थांबे

Nashik : राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गटांच्या शेतावर जैविक व नैसर्गिक पद्धतीने

Prakash Abitkar : मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानातून मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाचे होणार निदान मुंबई : राज्यातील

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचे काम याच वर्षी सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड