
मुंबई : वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात ऐनवेळी बदल केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. वेगवान, आरामदायी म्हणून बिरुद असलेल्या वंदे भारतला 'नाव मोठं, लक्षण खोटं’ असे प्रवासी म्हणू लागले. वंदे भारतही विलंबाने धावण्यास सुरुवात झाल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले. रविवारी सीएसएमटी ते नांदेड वंदे भारत सीएसएमटीवरून दुपारी १.१० वाजता वंदे भारत सुटणार होती. परंतु, काही कारणास्तव, ही रेल्वेगाडी सायंकाळी ७.३० वाजता सुटण्याचे नियोजित केले. याबाबतची माहिती प्रवाशांना सकाळी १०.३० च्या सुमारास कळविण्यात आले.