Monday, October 20, 2025
Happy Diwali

गौतमी पाटीलचा डान्स आणि स्वप्नील जोशी व भाऊ कदमची भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांना पहायला मिळणार!

गौतमी पाटीलचा डान्स आणि स्वप्नील जोशी व भाऊ कदमची भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांना पहायला मिळणार!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आता एक दमदार आणि हटके जोडी प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ती जोडी आहे लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी आणि कॉमेडी किंग भाऊ कदम यांची. ही भन्नाट केमिस्ट्री 'प्रेमाची गोष्ट २' या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'लव्हस्टोरीचे किंगमेकर' म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यामुळे हा चित्रपट आधीच चर्चेत आहे. या चित्रपटात हटके कलाकार, आकर्षक व्हीएफएक्स (VFX) आणि रोमान्सचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात गौतमी पाटीलचे जबरदस्त नृत्य असल्यामुळे त्यात आणखी भर पडली आहे.

या सर्व गोष्टींपेक्षाही खास बाब म्हणजे, स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम हे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये या दोघांची ऑनस्क्रीन ट्यूनिंग खूपच भन्नाट आणि विनोदी वाटत आहे. त्यांच्या जोडीमुळे चित्रपटाला एक वेगळी उंची मिळणार आहे.

हे दोघेही कलाकार आगळ्यावेगळ्या भूमिकेत आणि अनोख्या कथानकात प्रेक्षकांना भेटायला येत आहेत. त्यामुळे २१ ऑक्टोबरपासून प्रदर्शित होणा-या 'प्रेमाची गोष्ट २' मधून प्रेक्षकांना नक्कीच एक जबरदस्त आणि मनोरंजक कंटेंट बघायला मिळेल यात शंका नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा