
मोहित सोमण: जागतिक स्थैर्याच्या संकेतासह मजबूत चीनच्या आकडेवारीमुळे आज वैश्विक व आशियाई शेअर बाजारात वाढ झाली आहे. दिवाळीच्या पहाटेच वाढलेल्या गिफ्ट निफ्टीसह आज शेअर बाजारात वाढ जाणवत आहे. आज सकाळच्या सुरूवातीच्या कलात सेन्सेक्स ५४२.५७ अंकाने व निफ्टी १४०.७५ अंकाने उसळला आहे. बँक निफ्टी नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. विशेषतः आज ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही मोठी वाढ झाली. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील बँक निर्देशांकातील चांगल्या वाढीसह तेल व गॅस (१.०८%), मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.८९%), पीएसयु बँक (०.९०%) निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली असून घसरण (०.२४%), रिअल्टी (०.०३%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.३६%) निर्देशांकात झाली आहे. मुख्यतः आज शेअर बाजारातील वाढ ची नच्या मजबूत फंडामेंटलमुळे होताना दिसत आहे.
सकाळच्या सत्रात आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात स्ट्रेट टाईम्स (०.६३%) वगळता इतर सर्व निर्देशांकात वाढ झाली ज्यामध्ये सर्वाधिक वाढ हेंगसेंग (२.४९%), तैवान वेटेड (१.२८%), निकेयी २२५ (२.७३%), कोसपी (१.४२%) निर्देशांकात झाली आहे. उद्या मुहुरत ट्रेडिंग (समावत) विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले असल्याने एकूणच गुंतवणूकदारांमध्ये नवा दिवाळी उत्साह कायम असू शकतो. गेल्या आठवड्यात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सेल ऑफ मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने बाजारात विशेषतः मिड स्मॉल कॅप शेअरमुळे सपोर्ट लेवल मिळू शकते.
चीनच्या अर्थव्यवस्थेत गेल्या वर्षीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत ४.८% वाढ झाली. चीनमधील आकडेवारीनुसार, स्थिर मालमत्ता गुंतवणूकीत रिअल इस्टेटसह पहिल्या नऊ महिन्यांत अनपेक्षितपणे ०.५% घटली. प्रामुख्याने पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक मंदावली आहे .रॉयटर्सने केलेल्या सर्वेक्षणात विश्लेषकांनी ०.१% वाढ होण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेत वाढ झाली असली तरी मालमत्ता गुंतवणूकीत घट वाढली, सप्टेंबरपर्यंत १३.९% घट झाली, तर वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत १ २.९% घट झाली आहे. तज्ञांनी असाही इशारा दिला की चौथ्या तिमाहीतील जीडीपी वाढीवर घसरणीचा दबाव आहे. परंतु युएसने तीनवरील घेतलेल्या सौम्य भूमिकेमुळे व भारत व युएस यांच्यातील बोलणीला सुरूवात झाल्याने वातावरण तात्पुरते सकारात्मक आ हे. भूराजकीय पातळीवरही गाझा करार यशस्वी झाल्याने आज तेल व गॅस निर्देशांकात विशेष वाढ झाली.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एयु स्मॉल फायनान्स बँक (५.४८%), इ क्लर्क सर्विसेस (५.४५%), फेडरल बँक (४.५३%), रेडिको खैतान (४.८२%), आरबीएल बँक (३.५४%), जे के टायर्स (३.११%), रिलायन्स इंडस्ट्रीज (२.७५%), पीटीसी इंडस्ट्रीज (२.५५%), अशोक लेलँड (१.७२%), बँक ऑफ महाराष्ट्र (१.६५%), नेटवेब टेक्नॉलॉजी (१.५२%) समभागात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण युटीआय एएमसी (९.२७%), तेजस नेटवर्क (७.४३%), जेएसडब्लू एनर्जी (३.९०%), हिंदुस्थान झिंक (२.९८%), पुनावाला फायनान्स (२.५१%), इंडियामार्ट (२.२१%), वर्लपूल इंडिया (२.१५%), हिमाद्री स्पेशल (२.०७%), आय सीआयसीआय बँक (२.०३%), सारडा एनर्जी (१.७१%), आलोक इंडस्ट्रीज (१.५७%), एसबीएफसी फायनान्स (१.५१%) समभागात झाली आहे.