
पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जीएसटी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर बाजारात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झालेले दिसू लागले आहे. नवरात्रीत दिवाळी खरेदीसाठी जोरदार खरेदीची लाट उसळली होती. पण दिवाळीतही ही लाट कायम आहे आणि जीएसटी कपातीच्या रूपाने भारताला ही भेट मिळाली आहे असे समजले जात आहे. पण सर्वात जास्त फायदा ई कॉमर्सच्या व्यवसायाला आलेल्या झळाळीमुळे आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये बाजारपेठांमध्ये अतिरिक्त उत्साह निर्माण झाला आहे. कारण ग्राहक लक्षणियरीत्या खर्च करत आहे आणि त्यांची क्रयशक्ती वाढली आहे.
त्यांच्या जोडीला जीएसटी कपात मदतीला आहे आणि कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही कामगिरीने उत्साहाचे वातावरण आहे. सहसा कोणताही सणांचा उत्सव हा अर्थव्यवस्थेला चालना देणाराच असतो. तो प्रमुख आर्थिक कॅटलिस्टही असतो. त्यांचे अनेक घटक आहेत जसे की या काळात ग्राहकांची खरेदीचा उत्साह उतू जात असतो आणि खर्च अतोनात केला जातो. वास्तविक भारताची परिस्थिती आज काही वर्षापूर्वी होती तशी नाही. आज भारताचा ग्राहक खिशात बऱ्यापैकी पैसे धेऊन दुकानात जात असतो. महागड्या वस्तू खरेदी करत असतो. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इडस्ट्रीजने सांगितले, की दिवाळी हे वाढीचा सर्वात महत्त्वाचा घटक असतो आणि ते यंदा दिसले आहे. दिवाळीच्या दिवसात सुवर्णाची खरेदी आणि गृहोपयोगी वस्तूंची खरेदी जोशात केली जाते.
यंदाही ती लाट दिसते आहे. तसेच पारंपरिक आणि ऑनलाईन रिटेलर्सची विक्री वाढली आहे. यामुळे बाजारात खरेदीची धूम आणि ग्राहकांची अतोनात गर्दी दिसून येते. यंदा दिवाळीची खरेदी किती झाली ही आकडेवारी आज समोर नसली तरीही अगदी काही दिवसांत ती समोर येईल आणि ती रेकॉर्ड ब्रेक असेल असा अदाज आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या ई-कॉमर्सच्या विशाल कंपन्यांकडे प्रचंड मागण्या आहेत आणि त्या पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत. वाढत्या किमती असूनही सोन्याच्या खरेदीला उत आला आहे. रिझर्व्ह बँकेने नवीन नियम घालून दिल्यानुसार सोने खरेदी आणि सोन्यावर कर्ज मिळवणे सोपे झाले आहे ही ग्राहकांच्या समाधानाची बाब आहे.
दिवाळी हा सण संपत्ती निर्मिती आणि व्यापारी आकार वाढवण्यासाठी शुभ समजला जात असल्याने गुंतवणूकदारांसाठी हा सण उत्साहाने भारलेला असतो. त्या दृष्टीने मोदी सरकारने आल्यापासून जनतेला एकापेक्षा एक भेटी देण्याचे ठरवले आहे आणि त्यापैकीच आहे जीएसटी कपात. जी एसटी कपातीमुळे ग्राहकांच्या खिशातील बराचसा पैसा वाचला असून तो आपोआपच बाजारात ओतला जात आहे. जीएसटी २.० मुळे अनेक वस्तूंच्या किमती जनतेच्या आवाक्यात आल्या आहेत आणि आयकर सुधारणांमुळे उपभोग आणि खासगी भांडवली खर्च आटोक्यात आला आहे. दिवाळी खरेदीमुळे किरकोळ विक्री वाढते आणि उत्पादनाला चालना मिळते आणि अर्थव्यवस्थेत मोठी उलाढाल होते. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. यंदाच्या दिवाळीच्या उत्साहात ग्राहक कपडे, इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वस्तूंच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला गेला आहे. हे दिसतेच. या काळात मागणी वाढल्यामुळे कंपन्यांना अधिक उत्पादन करावे लागते आणि त्यामुळे उत्पादनाला चालना मिळून रोजगार निर्मिती जोरदार होते. त्यात यंदा जीएसटी कपातीचा शॉक नसल्यामुळे किंवा बराचसा कमी झाल्यामुळे ग्राहकांच्या खिशात पैसा अधिक वाजू लागला आहे. दिवाळीमुळे कर महसुलात वाढ ही चांगलीच होते आणि ही बाब आर्थिक वाढीसाठी उत्साहवर्धक असते.
दिवाळी हा केवळ प्रकाशाचा सण नाही तर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही तो एक प्रकाशमान सण आहे. हा सण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. त्यामुळे भारतात ग्राहकांच्या संख्येत अविश्वसनीय वाढ झाली आहे. यंदाच्या दिवाळीत ४ ते ४.२५ कोटी लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. २०१९ पासून ते २०२५ पर्यंत दिवाळीच्य ग्राहकांनी केलेल्या खर्चात अनपेक्षित वाढ झाली आहे. २०२४ मघ्ये तो दिवाळीला ४.२५ लाख कोटी होता. यंदा तो यापेक्षाही अधिक असण्याची अपेक्षा आहे. यंदा बरेच ग्राहक ऑनलाईन खरेदीकडे वळल्याने ई कॉमर्सच्या व्यवसायात प्रचंड वाढ झाली आहे आणि २०१९ मध्ये ३५ हजार कोटी रुपयांवरून ई कॉमर्सचे मूल्य १.२ लाख कोटी रुपयांपर्यंत गेले आहे.
दिवाळी खरेदीसाठी रस्ते ओसंडून वाहत आहेत आणि नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी होऊ लागलीय. पण सोने खरेदीसाठी याच काळात ग्राहकांची झुंबड उडते. यंदा सोन्याची विशेषतः खरेदी विक्रमी झाली ती आहे ती एक लाख कोटी रुपये. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात यंदा २५ टक्के वाढ झाली आहे. एकाच दिवशी एक लाख कोटी रुपयांची विक्री ही सोन्याचा उच्चांक तर आहेच पण तो विक्रमी आहे. तितकीच चांदीची विक्रीही झाली आहे. सोन्याकडे ग्राहकांचा कल वाढतो आहे आणि त्यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ होणे साहजिक आहे. दिवाळी हा सण शुभ मानला जातो आणि त्यामुळे पारंपरिक उत्साहात जाऊन लोक खरेदी करत असतात. दिवाळीच्या दिवशी सर्वच व्यवसायांसाठी तेजीचे दिवस असतात आणि त्यमुळे ग्राहकांच्या खिशात पैसा ओसंडून वाहत असतो.
त्यामुळे यंदा बाजारात ग्राहकांची रेलचेल दिसत आहे. संपूर्ण देशभरातील आकडेवारी नाही तरी जी आकडेवारी आहे ती प्रातिनिधिक म्हणावी लागेल. त्यानुसार ही सोन्याचांदीच्या वस्तुंच्या विक्री झाली ती ६० हजार कोटी रुपये तर किचन घरगुती वापराच्या वस्तूंची विक्री झाली ती १५ हजार कोटी रुपये. इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची विक्री पोहोचली ती यंदा १० हजार कोटी रुपये. मेवा मिठाईची विक्री झाली ती १२ हजार कोटी रुपये. यावरून ग्राहकांची पोझिशन कळते आणि त्यावरून हा निष्कर्ष निघतो की दिवाळी असो की सणासुदीचे दिवस असो ती इलेक्शन, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हे इंजिन्स आहेत.