
मोहित सोमण:आरबीएल बँकेच्या शेअरमध्ये आज मोठी इंट्राडे वाढ झाली आहे.प्रामुख्याने बँकेने आपला तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी बँकेच्या नैसर्गिक वाढीत मजबूती असल्याचे स्पष्ट केले होते. विशेषतः सिटी या ब्रोकरेज कंप नीने एमिरेट्स एबीडी (Emirates NBD) कंपनीने बँकेच्या अतिरिक्त २६% हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर दिली होती. माहितीनुसार, प्रेफरन्संशियल बायिंग (प्राधान्य खरेदी) इक्विटी ऑप्शन अँशुरन्स पद्धतीमार्फत खरेदी केला जाणार आहे. २८० रूपये प्रति शेअर प्रमाणे हा व्यवहार संपन्न होणार आहे. अशातच बँकेच्या समाधानकारक तिमाही निकालासह ही नवी घडामोड घडल्यामुळे शेअरला आज मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. अंतिमतः शेअर्समध्ये वाढ झाली. सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्या कला तच शेअर ६ ते ७% उसळला होता. सकाळी ११.३२ वाजता कंपनीचा शेअर ७.४१% उसळला असून ३२१.४५ रूपये प्रति शेअर व्यवहार करत आहे. यूएईस्थित एमिरेट्स एनबीडी पीजेएससीने खाजगी क्षेत्रातील आरबीएल बँकेसोबत ६०% पर्यंतच्या नियंत्रणात्मक भागभांडवलासाठी २६८५० कोटी (सुमारे $३ अब्ज) गुंतवणूक करण्याचा करार केला आहे, जो भारतीय खाजगी बँकेत सर्वात मोठा क्रॉस बॉर्डर गुंतवणूक आहे. त्यामुळे खाजगी इक्विटी सर्वाधिक असणारी आरबीएल बँक ठरणार आहे.
'प्रस्तावित गुंतवणूक प्राधान्य इश्यूद्वारे केली जाईल आणि नियामक मंजुरी आणि पारंपारिक बंद होण्याच्या अटींच्या अधीन असेल' असे बँकेने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे.नेमक्या आकडेवारीनुसार, प्राधान्य वाटपाअंतर्गत एमिरेट्स एनबीडीला प्रति शेअर २८० या दराने ९५९.०४ दशलक्ष शेअर्स विकले जातील. या व्यवहारामुळे आरबीएल बँकेत ६०% हिस्सा वाढणार आहे. वाटपाची अंतिम आकडेवारी जाहीर करताना उपलब्ध असलेल्या परदेशी मालकीच्या मर्यादेवर अवलंबून असेल. एमिरेट्स एनबीडी बँकेत कि मान ५१% एकूण हिस्सा खरेदी करेल. ज्यामध्ये एनबीडी बँकेची प्रवर्तक (प्रमोटर) बनेल.
या व्यवहाराचा एक भाग म्हणून, एमिरेट्स एनबीडी सेबीच्या टेकओव्हर नियमांनुसार आरबीएल बँकेच्या सार्वजनिक भागधारकांकडून २६% पर्यंतचा हिस्सा खरेदी करण्यासाठी अनिवार्य ओपन ऑफर देखील करेल. ४१५.५८ दशलक्ष शेअर्ससाठी ओपन ऑफर किंमत प्रति शेअर २८० इतकी निश्चित करण्यात आली आहे. या करारात एमिरेट्स एनबीडीच्या भारतातील शाखांचे आरबीएल बँकेसोबत विलीनीकरण देखील समाविष्ट आहे. मुंबई, दिल्ली आणि चेन्नई येथे एमिरेट्स एनबीडी सध्या भारतात तीन शाखा चालवते. 'विनिमयाच्या परिणामकार कतेचा विचार करून आणि विचारात घेतल्यास, एमिरेट्स एनबीडीला प्रति शेअर २८० या समान किमतीत बँकेत अतिरिक्त शेअर्स वाटप केले जातील' असे आरबीएल बँकेने यावेळी म्हटले आहे.
व्यवहार पूर्ण झाल्यानंतर, एमिरेट्स एनबीडीला आरबीएल बँकेचे प्रवर्तक म्हणून नियुक्त केले जाईल आणि त्यांच्या बोर्डावर संचालक नियुक्त करण्याचा अधिकार असेल असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 'आरबीएल बँकेतील आमची गुंतवणूक ही भार ताच्या गतिमान आणि विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील आमच्या विश्वासाचे प्रतीक आहे. ही धोरणात्मक जुळवणी आरबीएल बँकेच्या वाढत्या देशांतर्गत फ्रँचायझीला एमिरेट्स एनबीडीच्या प्रादेशिक पोहोच आणि आर्थिक कौशल्याशी एकत्र करते, ज्यामुळे वाढ आ णि नावीन्यपूर्णतेसाठी एक अद्वितीय व्यासपीठ तयार होते' असे एमिरेट्स एनबीडीच्या ग्रुप सीईओ शेन नेल्सन म्हणाल्या आहेत.
नेल्सन म्हणाले की आरबीएल बँकेसारख्या सुस्थापित व्यवसायाद्वारे भारतात वाढलेली उपस्थिती मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका, तुर्की आणि दक्षिण आशिया (मेनाटासा) प्रदेशातील ग्राहकांना एमिरेट्स एनबीडीच्या सेवेला आणखी पूरक ठरेल. बँकेच्या मते, भांडवली गुं तवणूकीमुळे तिचा ताळेबंद लक्षणीयरीत्या मजबूत होईल, तिचा टियर-१ भांडवल गुणोत्तर वाढेल आणि दीर्घकालीन वाढीचे भांडवल प्रदान होईल, ज्यामुळे ती तिची ठेव फ्रँचायझी अधिक खोलवर नेण्यास आणि तिच्या शाखा नेटवर्कचा विस्तार करण्यास सक्षम हो ईल.व्यवहारानंतर, आरबीएल बँकेची निव्वळ संपत्ती १५००० कोटींवरून ४२००० कोटींपर्यंत वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बँकेने म्हटले आहे की एमिरेट्स एनबीडीच्या मजबूत क्रेडिट रेटिंगचा आणि भारतातील कॉर्पोरेट, बँका आणि वित्तीय संस्थांशी असलेल्या तिच्या स्थापित संबंधांचा देखील त्यांना फायदा होईल.
'ही भागीदारी एक मजबूत आणि जागतिक स्तरावर प्रतिष्ठित अँकर शेअरहोल्डर सुरक्षित करते, जो आमच्या भविष्यासाठी एक मजबूत भांडवल आधार प्रदान करते. या युतीमुळे निर्माण होणाऱ्या सहकार्याबद्दल आम्हाला उत्सुकता आहे आणि आमची एकत्रित ता कद सर्व भागधारकांना उत्कृष्ट मूल्य देईल असा आम्हाला विश्वास आहे' असे आरबीएल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आर सुब्रमण्यकुमार म्हणाले आहेत.
तिमाही निकालानुसार, बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (Net Interest Income NII) मोठ्या प्रमाणात वाढले. निव्वळ व्याज मार्जिन (Net NII) मध्ये किरकोळ वाढ झाली, जी मागील तिमाहीत ४.५०% च्या तुलनेत अनुक्रमे १ बेसिस पूर्णांकाने वाढून ४.५१% झाली असे आकडेवारीत स्पष्ट झाले.प्री-प्रोव्हिजन ऑपरेटिंग नफा (Prop) वाढीला ऑपरेटिंग खर्चात घट झाल्यामुळे मदत झाली. तथापि, तिमाहीत वाढत्या प्रोविजनमुळे (उच्च तरतुदीमुळे) नफ्यावर परिणाम झाला असे बँकेने निकालादरम्यान स्पष्ट केले होते. परिणामी बँकेच्या करोत्तर नफ्यात (PAT) मध्ये २०% वार्षिक घट झाली. आज फ्युचर्स अँड ऑप्शन्स (एफ अँड ओ) विभागात आरबीएल बँकेचा स्टॉक बंदीखाली आहे. बँकेच्या शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढल्याने शेअरची मागणीही वाढली.