Monday, October 20, 2025
Happy Diwali

मुलगी ऐकत नसेल, तर तिच्या तंगड्या तोडा: प्रज्ञा ठाकूर

मुलगी ऐकत नसेल, तर तिच्या तंगड्या तोडा: प्रज्ञा ठाकूर

भोपाळ : “जर आमच्या मुलीने बिगर हिंदूच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तिचे पाय तोडण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. कारण जे लोक कर्मकांड पाळत नाहीत, जे शब्द पाळत नाहीत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे,” असे विधान माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मुलींचे संगोपन आणि 'लव्ह जिहाद'बद्दल बोलताना केले आहे. यामुळे राजकीय, सामाजिक वर्तुळात वाद निर्माण झाला आहे.

प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, ‘जर एखादी मुलगी तिच्या पालकांचे ऐकत नसेल आणि दुसऱ्या धर्माच्या पुरुषाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असेल तर कुटुंबाने तिला थांबवण्यासाठी आणि तिला योग्य मार्गावर परत आणण्यासाठी ठाम भूमिका घेतली पाहिजे.’ पुढे साध्वी प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, “जर गरज पडली तर तिचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी तिला फटकारून दाखवा. जर एखादी मुलगी ऐकण्यास नकार देत असेल तर तिचे पाय तोडून टाका. जर तुम्हाला तिच्या भविष्यासाठी तिला मारहाण करावी लागली तर मागे हटू नका.”

“जेव्हा मुलगी मोठी होते तेव्हा ती अनेकदा स्वतःचा मार्ग निवडू लागते आणि कधीकधी घरातून पळून जाण्याचा प्रयत्नही करते. अशा परिस्थितीत, कुटुंबाने सतर्क राहून मुलगी योग्य मार्गावर राहावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. जर तिला पटवून देण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या तर मागे हटू नका.” अशी टिप्पणीही ठाकूर यांनी केली आहे. साध्वी प्रज्ञा यांच्या विधानावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक टीकाकारांनी याला महिलांच्या हक्कांचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अवमान म्हटले आहे.

Comments
Add Comment