Monday, October 20, 2025
Happy Diwali

गोखले बिल्डर्सच्या कंपन्यांमधून बाहेर पडल्याची कागदपत्रे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत, मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण

गोखले बिल्डर्सच्या कंपन्यांमधून बाहेर पडल्याची कागदपत्रे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत, मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण

पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीनीच्या व्यवहारावरून केंद्रीय राज्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे खासदार मुरलीधर मोहोळ चर्चेचा विषय बनला आहे. जैन संघटनांमध्ये मोहोळ यांच्याबद्दल असणारा राग, शेतकरी नेते राजू शेट्टींची टीका आणि धंगेकरांच्या खोचक टीकेनंतर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीच्या व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही. ज्या गोखले बिल्डर्सशी माझी भागीदारी असल्याचा आरोप होत आहे, त्यांच्या दोन्ही कंपन्यांमधून मी वर्षभरापूर्वीच बाहेर पडलो होतो. त्यामुळे जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण मुरलीधर मोहोळांनी दिले आहे. तसेच गोखले बिल्डर्सच्या दोन कंपन्यांमधून मी बाहेर पडल्याची कागदपत्रे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत, असेही मोहोळांनी सांगितले.

मोहोळांवर आरोप करणाऱ्या राजू शेट्टींबद्दल बोलताना मोहोळ म्हणाले की, राजू शेट्टी हे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेते आहेत. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांनी माझ्यावर इतका मोठा आरोप करताना मला विचारायला हवे होते. मी त्यांना सत्य परिस्थिती समजावून सांगितली असती. त्यांना जी माहिती देण्यात आली त्याआधारे त्यांनी माझ्यावर आरोप केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा