Monday, October 20, 2025
Happy Diwali

दिवाळीचा आकाश कंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या तरुणाचा झाडावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू

दिवाळीचा आकाश कंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या तरुणाचा झाडावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू

पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आकाशकंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या एका तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वडगावशेरी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

संतोष कुसाळ (४५, रा. गणेशनगर) असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. वडगावशेरी येथील एका तरुण मंडळाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. काल दिवसभर त्यांनी मंडळातील इतर सदस्यांसह किल्ला बांधण्याचे काम केले.

रात्री मोठा आकाश कंदील रस्त्यावर लावण्यासाठी ते झाडावर चढले होते. दोरी बांधताना अचानक त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >