
मुंबई : जवान फेम दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या आगामी चित्रपटात दीपिका पदुकोण आणि अल्लू अर्जुन दिसणार आहेत दीपिका यामध्ये जबरदस्त ऍक्शन सीन्स करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसच दीपिका आणि अल्लू अर्जुन ही नवीन जोडी पहिल्यांदाच पदड्यावर झळकणार आहे. अल्लू अर्जुन हा साऊथचा सुपरस्टार आणि दीपिका ही बॉलीवूडची सुपरस्टार आणि तितकाच मोठा त्यांचा फॅनबेस सुद्धा आहे. त्यामुळे यांच्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
रणवीर सिंग ने नुकतीच या सिनेमाच्या सेटला भेट दिली. दीपिकाच्या या चित्रपटविषयी बोलताना रणवीर म्हणाला ," मी अॅटलीच्या सेटवर गेलो होतो, दीपिकाचा शूट तिथे सुरु होतं. सिनेमाची स्केलच अशी आहे कि या आधी आपण कधीच पहिली नसेल, न भूतो न भविष्यती असा हा सिनेमा असणार आहे. मी बऱ्याच काळापासून अटली चा चाहता आहे. जवानच्या यशाआधी मी त्याचा " मर्सल " सिनेमा बघून प्रभावित झालो.
यावेळी त्याने बॉबी देओल आणि श्रीलीलाचेही कौतुक केले. श्रीलीला तर नॅशनल क्रश आहे. तिच्या आगामी सिनेमांबाबदल मला उत्सुकता आहे. ती मोठी स्टार बनेल. असे तो म्हणाला
रणवीर सिंग हा आगामी धुरंधर सिनेमात दिसणार आहे. सिनेमाचे फोटो आणि व्हिडीओ वायरल झाले आहे. आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमात रणवीर सोबत तगडी स्टारकास्ट आहे. संजय दत्त, आर माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, असे दिग्गज कलाकार आहेत, ५ डिसेंबर २०२५ रोजी सिनेमा भेटीला येत आहे.