Monday, October 20, 2025
Happy Diwali

अमरावतीत सलग २५ तासांत १५ हजार ७७३ डोसे !

अमरावतीत सलग २५ तासांत १५ हजार ७७३ डोसे !

विख्यात शेफ विष्णू मनोहर यांचा विक्रम

अमरावती : विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती शहरात सलग २५ तासांत एकूण १५ हजार ७७३ डोसे बनवण्याचा नवा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे, अमरावतीनंतर आता ते थेट अमेरिकेत २६ तास डोसे बनवण्याच्या नव्या विक्रमासाठी सज्ज झाले आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी विष्णू मनोहर यांनी नागपुरात २४ तासांत १४ हजार ४०० डोसे बनवण्याचा विक्रम नोंदवला होता. आजच्या या नव्या विक्रमाची राज्यभरात चर्चा आहे.

अमरावती शहरात गुणवंत लॉन येथे शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून विष्णू मनोहर यांनी सलग २५ तास डोसे बनवण्याच्या विक्रमला सुरुवात केली. रविवारी सकाळी ६ वाजता त्यांनी १५ हजार ७०० डोसे बनवून आपला जुना विक्रम मोडीत काढला. पंचांनी मधे २० मिनिटे ब्रेक दिल्यावर विष्णू मनोहर यांनी गरम तव्यावर पुन्हा चवदार डोसे तयार करून अनेक अमरावतीकरांची सकाळ चवदार केली.

८ वाजता अखेरचा म्हणजे १५ हजार ७७३ वा डोसा त्यांनी तयार केला आणि त्यांच्या नव्या विक्रमाचा जल्लोष त्यांचे सहकारी आणि उपस्थित अमरावतीकरांनी टाळ्यांच्या कडकडाटाने केला. याप्रसंगी 'इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड'च्या प्रतिनिधी पंच प्रवीण राऊत यांनी विष्णू मनोहर यांना पदक आणि प्रशस्तीपत्र बहाल करत त्यांच्या नव्या विक्रमाची घोषणा केली. अगदी पहाटे ३ वाजेपर्यंत अमरावतीकरांनी डोसा खाण्यासाठी गर्दी केली होती. पहाटे ३ ते ५ याच वेळेस शांतता होती. ५ वाजल्यापासून ८ वाजेपर्यंत अमरावतीकरांचा प्रचंड उत्साह अनुभवला," असे विष्णू मनोहर म्हणाले.

अमरावतीनंतर आता थेट 'मिशन अमेरिका'

"नागपूरला २४ तासांत डोसे तयार करण्याचा नोंदवलेला स्वतःचा विक्रम अमरावतीत मोडला. यापुढे असे दहा मॅरेथॉन पूर्ण करायचे असून, पुढचा विक्रम अमेरिकेत केला जाणार आहे,"  - विष्णू मनोहर

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा