Saturday, October 18, 2025
Happy Diwali

साप्ताहिक राशिभविष्य, १९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, १९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, १९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०२५

अनुकूलता अनुभवण्यास मिळेल

मेष : आपल्या कार्यक्षेत्रात नोकरी-व्यवसाय यामध्ये अनुकूलता अनुभवयास मिळेल. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. नोकरदारांना काहीसा दिलासा मिळू शकतो. काम उत्साहाने होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आर्थिक बाजू भक्कम राहील मात्र खर्चावर नियंत्रण हवे, तसेच आपल्या बोलण्यावर व वर्तणुकीवर नियंत्रण हवे. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या गाठीभेटी होतील. कलागुण छंद जोपासता येतील. जमिनीच्या कामांमध्ये यश मिळू शकते, प्रयत्न आवश्यक. मोसमी आजारांपासून सावध राहा. वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ मिळेल. कुटुंबात मंगल कार्य घडण्याची शक्यता. नवीन कार्यक्रमांचे नियोजन ठरेल. आर्थिक परिस्थिती समाधानकारक असेल.

घेतलेल्या कामात यश मिळेल

वृषभ : या आठवड्यात सामाजिक किंवा धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरी व्यवसायातील अडलेली कामे पूर्ण करू शकाल. अडचणींवर मात कराल. महत्त्वाच्या व्यक्तींच्या संपर्कात आलात तर त्यांचा लाभ मिळेल, मार्गदर्शन होईल. लहान मोठ्या कामानिमित्त प्रवास करावा लागेल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. सरकारी नियमांचे पालन आवश्यक. आर्थिक बाजू व्यवस्थित राहील. स्थावर विषयीचे प्रश्न सुटू लागतील. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. इतरांच्या म्हणण्याला प्राधान्य देणे फायदेशीर ठरू शकते. जोडीदाराची साथ मिळेल. नकारात्मक विचार व त्याचे परिणाम याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

अपेक्षित गोष्टी साध्य होतील

मिथुन : या आठवड्यात बऱ्यापैकी ताण सैल झाल्यासारखा वाटेल. बेकारांना नोकरीची संधी प्राप्त होण्याची शक्यता. नोकरदारांना दिलासा मिळेल. आर्थिक चिंता मिटतील. मात्र मनाने ऐकण्याची सवय बदलावी लागेल शांतपणे विचार करून निर्णय घ्या. कुटुंबीयांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. येणाऱ्या समस्यांना हुशारीने सामोरे जावे. प्रकृतीकडे लक्ष द्या. कुटुंबीयांच्या मतास प्राधान्य द्या. राजकारणात कार्य करणाऱ्या जातकांना विरोधकांचा सामना करावा लागेल. विद्यार्थी वर्गाने वेळ न दवडता अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरेल. विवाह ठरतील.

प्रेमप्रकरणात जपून राहा

कर्क : अनुकूल ग्रहमान यामुळे भाग्याची साथ मिळेल. बहुतांश क्षेत्रात यश प्राप्ती होईल. अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. जमीन जुमला स्थावरसंपत्ती तसेच वडिलोपार्जित संपत्ती विषयीचे थांबलेले व्यवहार गतिमान होऊन पूर्णत्वाच्या मार्गावर येतील. काही महत्त्वाचे निर्णय घेता येतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुका फायदेशीर सिद्ध होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश संभवते. मात्र प्रेमप्रकरणात जपून राहा. गैरसमजामूळे वाद-विवाद निर्माण होऊ शकतात. घरामध्ये एखादे धार्मिक कार्य होईल. चालू नोकरीमध्ये बदलीची शक्यता त्याचबरोबर कामाच्या स्वरूपात बदल घडून जबाबदारीमध्ये वाढ होऊ शकते.

प्रवासकार्य सिद्ध होतील

सिंह : नोकरी, व्यवसाय, धंद्यानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील. प्रवास कार्य सिद्ध होतील. अर्थप्राप्ती होईल. मात्र प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांची विशेष काळजी घेणे गरजेचे ठरेल. हरवण्याची शक्यता. प्रवासात नवीन ओळखी होतील. त्याच प्रमाणे खर्चातही वाढ होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. कौटुंबिक गोष्टींकडे अथवा समस्यांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असल्याने वेळेचे नियोजन करावे लागेल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या.

आर्थिक परिस्थिती चांगली राहील

कन्या : सदरच्या कालावधीमध्ये आपल्याकडील मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे, वाहने याकडे विशेष लक्ष देणे जरूरीचे आहे. वाहन सुरक्षित जागी पार्क करा. चोरीची शक्यता नाकारता येत नाही. तसेच एकूण सर्व बाबतीत प्रयत्नशील राहिल्यास आवश्यक त्या गोष्टी साध्य होतील. शेतीविषयक व कोर्टकचेरीच्या संबंधित कामांना गती मिळेल. जमीनजुमला स्थावर याविषयीची रेंगाळलेली कामे पुढे जातील. मधेच कधीतरी मानसिक ताण निर्माण होणाऱ्या घटना घडू शकतात.

महत्त्वाच्या कामांकडे लक्ष द्या

तूळ : या आठवड्यात थोडेसे हुशारीने वागल्यास आणि सतर्क राहिल्यास अपेक्षित गोष्टी पूर्ण करू शकाल. महत्त्वाच्या कामांकडे लक्ष द्या. कोणतेही निर्णय घेताना सतर्क राहणे आवश्यक आहे विशेषतः लहान-मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये, नोकरीतील परिस्थिती सर्वसामान्य राहील. स्वतःच्या कामकाजात अधिक लक्ष ठेवा. आपले ज्ञान अद्ययावत ठेवा. इतरांना कामात मदत कराल.आप्तेष्ट नातेवाईक यांच्या गाठीभेटी होतील. मित्रमंडळींच्यामध्ये निरनिराळ्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. स्वतःच्या प्रकृतीकडे पुरेसे लक्ष देणे आवश्यक आहे.

आपल्या अंतर्मनाचे ऐका

वृश्चिक : या आठवड्यात एकूण सर्वच बाबतीत नकारात्मक विचार सोडणे आवश्यक राहील. काही बाबतीत धाडसी निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता आहे. आपल्या अंतर्मनाचे ऐका. इतरांच्या बोलण्यात फारसे येऊ नका. आपले निर्णय योग्य व अचूक ठरतील. कोणताही निर्णय घेताना मनात संशय येऊ देऊ नका. कलाकार, खेळाडू यांच्या गुणांना वाव मिळेल. नवीन संधी उपलब्ध होतील. आप्तेष्ट नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या गाठीभेटी होतील. स्थावर संपत्ती बद्दलच्या समस्या संपुष्टात येतील. अर्थार्जन चांगले राहील.

बोलण्यावर नियंत्रण हवे

धनु : एकूण सर्वच बाबतीत अनुकूलता लाभल्याने बहुतेक क्षेत्रातील कामे सुलभ होऊन अपेक्षित कामे होतील मात्र नोकरीमध्ये काही प्रमाणात वरिष्ठांचा जाच सहन करण्याची तयारी ठेवा. आपल्या कामांमधील ज्ञान अद्यावत ठेवा. त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. राजकीय क्षेत्रातील जातकांना सदरील काळ चांगला राहील. आपल्या कार्याची दखल घेतली जाऊन जनमानसात आपली प्रतिमा उजळ होण्यास मदत होईल मात्र आपल्या वर्तणुकीवर व बोलण्यावर नियंत्रण हवे.

दिलासा मिळेल

मकर : प्रयत्न अधिक केल्यास आपल्या परिश्रमाला यशाची झालर निश्चितच प्राप्त होऊ शकेल. नोकरीत अपेक्षित गोष्टी साध्य होतील त्यामुळे दिलासा मिळेल. समोर येणाऱ्या आव्हानांना एक संधी म्हणून तिचा स्वीकार करणे योग्य ठरेल. भविष्यात त्याचा उपयोग आपल्याला निश्चितच होईल. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. कोणीही आपल्यावर नाराज होणार नाही याची काळजी घ्या. कोणालाही अपमानास्पद वागणूक देऊ नका. महिलांच्या कलागुणांना विशेष वाव मिळेल कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यासाकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. आरोग्य सांभाळा.

प्रेमात गैरसमज घडू शकतात

कुंभ : आजूबाजूच्या परिस्थितीत बदल होताना जाणवेल. घटना मिश्र स्वरूपाच्या घडू शकतात; परंतु परिस्थितीनुसार विचार बदलाचे धोरण स्वीकारल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. नोकरदारांना नोकरीत मोठा दिलासा मिळेल. सरकारी नोकरीत पदोन्नती मिळू शकते मात्र बदलीची शक्यता. कामाच्या स्वरूपात बदल होऊ शकतो. तसेच आपली अधिकारकक्षा रुंदावेल. नकारात्मक विचारांच्या व्यक्तींचा सहवास प्रकर्षाने टाळा. प्रेमात गैरसमज घडू शकतात. त्याबद्दल काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करणे भविष्याच्या दृष्टिकोनातून हितकारक ठरेल. कलागुणांना पुरेसा वाव मिळाल्यामुळे आनंद होईल. धनलाभ होईल.

उधारी-उसनवारी टाळा

मीन : पूर्वी घेतलेले निर्णय व नियोजन सध्या कार्यरत होताना दिसेल व त्याचा लाभ होईल. नोकरीत पूर्वी घेतलेले कष्ट फलद्रूप होतील. पदोन्नती वेतन वृद्धी होईल. व्यवसाय-धंद्यात केलेले बदल सकारात्मक सिद्ध होतील. त्याचा व्यवसायावर चांगला परिणाम होईल. उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल मात्र उधारी उसनवारी टाळा. काही वेळेस आजूबाजूस किंवा जवळच्या लोकांपासून नकारात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यापासून स्वतःला दूर ठेवा. हितशत्रूंच्या कारवाई वाढू शकतात. प्रिय व्यक्तीच्या सहवासात राहता येईल. स्थावर विषयी प्रश्न मिटतील.
Comments
Add Comment