पॅरिसमधील प्रसिद्ध लूव्र संग्रहालयात चोरी, घटनेनंतर संग्रहालय बंद

लंडन : पॅरिसमधील प्रसिद्ध लूव्र म्युझियममध्ये चोरीची घटना घडल्याने म्युझियम एक दिवसासाठी अचानक बंद करण्यात आले आहे. या चोरीची माहिती फ्रान्सच्या एका मंत्र्यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरांनी संग्रहालयातून मौल्यवान दागिन्यांची चोरी केली आहे.ही चोरी सिनेस्टाईलप्रमाणे अत्यंत नियोजनबद्ध रितीने करण्यात आली.

फ्रान्सचे सांस्कृतिक मंत्री रचिदा दाती यांनी शनिवारी सर्वात आधी या चोरीबाबत माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, “आज सकाळी लूव्र म्युझियममध्ये चोरी झाली आहे. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मी सध्या म्युझियमच्या कर्मचाऱ्यांसोबत आणि पोलिसांसोबत घटनास्थळी आहे.”

फ्रेंच वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, चोर म्युझियममधून मौल्यवान दागिने चोरून पळाले. सध्या लूव्र प्रशासनाने या घटनेवर कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. मात्र, म्युझियमच्या वेबसाईटवर “विशेष कारणांमुळे आज म्युझियम बंद आहे” असे सांगण्यात आले आहे.

माहितीनुसार, पॅरिस पोलिसांनी सांगितले की, एक किंवा अधिक चोर सकाळी लवकर संग्रहालयात घुसले. चोरांनी सीन नदीच्या बाजूने असलेल्या भागातून प्रवेश केला, जिथे सध्या बांधकाम सुरू आहे. ते बांधकाम साहित्य नेण्यासाठी लावलेल्या बाह्य लिफ्टच्या माध्यमातून “अपोलो गॅलरी” च्या एका खोलीपर्यंत पोहोचले, आणि तिथल्या खिडक्या फोडून त्यांनी आत प्रवेश केला.

आत पोहोचल्यावर चोरांनी नेपोलियन आणि फ्रेंच महाराणीच्या दागिन्यांच्या संग्रहामध्ये चोरी केली.तेथून एकूण ९ मौल्यवान दागिने चोरून नेले आणि नंतर बाहेर वाट पाहत असलेल्या एका स्कूटरवरून पळून गेले. पोलिस आणि म्युझियम प्रशासनाने ही घटना स्पष्टपणे मान्य केली आहे, आणि सध्या चोरी गेलेल्या दागिन्यांची किंमत किती आहे याचा अंदाज घेतला जात आहे.

लूव्र म्युझियम हे जगातील सर्वात प्रसिद्ध कला संग्रहालयांपैकी एक आहे, आणि येथे मोनालिसा सारख्या जगप्रसिद्ध कलाकृतीही ठेवण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक

संयुक्त राष्ट्रे : रशियाने यूक्रेनवर केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त